शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डर वाधवानींस न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:37 IST

पिंपरी : जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी चिंचवडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी अटक केली.

पिंपरी : जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी चिंचवडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी अटक केली. दुसºया दिवशी कोर्टात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पालीस कोठडीची मुदत संपताच पोलिसांनी सोमवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.पिंपरी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी बिल्डर वाधवानी यांना पोलीस कोठडीत ठेवले. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.बनावट खरेदीखत प्रकरणी वाधवानी यांच्यासह तीन आरोपींपैकी विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांना पोलीस आणि न्यायालयीन कोठडीही देण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी नरेश वाधवानी मात्र अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविता न आल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ७ डिसेंबर २०१७ ला मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मिळाली होती. ही मुदत २१ डिसेंबरला संपली. त्यामुळे शनिवारी त्यांना अटक केली.>फसवणूक : निधनानंतर ४ वर्षांनी खरेदीखतस्वर्गीय महादेव हरी कढे यांच्या नावे असलेली पिंपळे सौदागर येथील सर्व्हे क्रमांक ३९/२/२ येथील जमीन श्रद्धा असोसिएट्स व भागीदार संस्थेला २००६ मध्ये विकसित करण्यासाठी दिली होती. ३१ आॅक्टोबर २००७ ला जमीन मालक कढे यांचा मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथील या जागेचे मंगलमूर्ती डेव्हलपर्सचे नरेश वाधवानी, तसेच विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी यांनी संगनमताने कढे यांच्या निधनानंतर ४ वर्षांनी अर्थात २०१० मध्ये बनावट खरेदीखत केले.हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावे बनावट सही करून खरेदीखत केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक वाधवानी यांच्यासह वकील विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी यांच्याविरुद्ध शांताराम बर्डे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २०१५ मध्ये चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पिंपरी न्यायालयाने याप्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई करण्याचा आदेश चिंचवड पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्यांना न्यायालयात हजर केले होते.