शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

बिल्डरधार्जिणे धोरण; भरकटलेला कारभार

By admin | Updated: October 5, 2015 01:48 IST

सर्वसामान्य, कष्टकरी-कामगारवर्गास घर देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणास ४३ वर्षे झाली.

विश्वास मोरे, पिंपरीसर्वसामान्य, कष्टकरी-कामगारवर्गास घर देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणास ४३ वर्षे झाली. बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या मूळ उद्देशापासून ही संस्था दूर जाऊ लागली आहे. अधिकारी आणि बिल्डरलॉबीचे साटेलोटे असल्याने सर्वसामान्य माणसांना घर व प्लॉट मिळणे हे दिवास्वप्न बनले आहे.पिंपरी-चिंचवड परिसरात औद्योगिक विकासाला सुरुवात झाल्यानंतर देशातील विविध भागांतील, तसेच राज्यातील विविध भागांतील नागरिक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात आले. त्यांच्या निवाऱ्यासाठी नियोजनबद्ध नवनगर उभे करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना १४ मार्च १९७२ ला झाली. परिसराची वाढती लोकसंख्या लक्षात घेताना वीज, पाणी, रस्ते या नागरी सुविधा बाजारपेठ, आरोग्य सेवा केंद्र, शाळा-कॉलेज व इतर सेवा-सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने चिंचवड, रावेत, वाल्हेकरवाडी, आकुर्डी, थेरगाव, भोसरी, निगडी, तळवडे, चिखली, काळेवाडी या दहा गावांतील गावांचे सुमारे १८४० हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले. त्यानुसार प्राधिकरणाने सुमारे ४० पेठांचा विकास करण्याचे काम सुरू केले. त्यांपैकी अनेक पेठांचा विकास अद्यापही झालेला नाही. कामगार वसाहत, उद्योगांना जागा कामगारांना घर मिळावे, या उद्देशाने प्राधिकरणाने भूखंड विकसित करून सात हजार भूखंडांचे वाटप सुरुवातीला केले. तसेच गृहनिर्माण सोसायट्या स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. यातून टेल्को, कूपर, सेंच्युरी एन्का, थरमॅक्स अशा विविध कारखान्यांच्या सोसायट्या अस्तित्वात आल्या. सुमारे १०० सोसायट्यांना पन्नास हेक्टर क्षेत्राचे वाटप करून सहा हजार कुटुंबांना मालकी हक्काची जागा मिळवून दिली. तसेच राज्य शासन, केंद्र शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचाऱ्यांच्या वसाहतींसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यातून जल-वायूविहार, रेलविहार, एलबासी कॉलनी हे गृहप्रकल्प उभे राहिले. तर अल्प उत्पन्न गट आणि कामगारांना घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्राधिकरणाने इंद्रायणीनगर, यमुनानगर, कोयनानगर, वेणूनगर, सिंधूनगर, गंगानगर यांसारखे प्रकल्प उभारून ११ हजार २२१ लोकांना सदनिकांचे वाटप केले. या सदनिका अत्यंत कमी किमतीत आणि सुलभ हप्त्यावर देण्यात आल्या. तसेच टेल्कोसारख्या कंपनीला ८२.११ हेक्टर जमीन दिली आणि पेठ क्रमांक ७ ते दहामध्ये सुमारे १५० हेक्टर क्षेत्रात छोटे-मोठे भूखंड विकसित करून छोट्या उद्योगांना देण्यात आले.क्रमश:नवीन शहर वसविणे हे प्राधिकरणाचे मूळ उद्दिष्ट होते. मात्र, गेल्या ४३ वर्षांत हे उद्दिष्ट ४० टक्केही पूर्ण झाले नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. चांगल्या उद्देशाने प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. मूळ उद्देशापासून ते भरकटल्याचे दिसून येते. एका शहरासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधाही मिळू शकलेल्या नाहीत. घरांचे उद्दिष्ट साध्य झाले असते, तर या शहरातील घरांचा प्रश्न बहुतांश प्रमाणात सुटला असता. - सारंग कामतेकर (माहिती अधिकार कार्यकर्ते, भाजपा नेते)