शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा प्रशासकीय राजवटीतील दुसरा अर्थसंकल्प सादर

By विश्वास मोरे | Updated: February 20, 2024 18:43 IST

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिल्लकेसह ५ हजार ८४१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे...

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे सन २०२३-२४ चे सुधारीत तसेच सन २०२४-२५ चे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसह सुमारे ८ हजार ६७६ कोटी ८० लाख रूपये खर्चाचे आणि ९ कोटी ९३ लाख रुपये शिल्लकीचे अंदाजपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन यांनी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे सादर केले. त्यानंतर या अंदाजपत्रकातील सविस्तर विश्लेषणात्मक माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विशद केली, त्यावेळी ते बोलत होते.  

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात आरंभीच्या शिल्लकेसह ५ हजार ८४१ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामध्ये प्रत्यक्षात खर्च ५ हजार ८३२ कोटी रुपये होईल तर मार्च २०२५ अखेर ९ कोटी रुपये इतकी रक्कम शिल्लक राहील.

महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांसाठी १ हजार ८६३ कोटी ४८ लाख रुपये इतक्या भरीव रकमेची तरतूद अंदाजपत्रकात केली गेली आहे. क्षेत्रीय स्तरावरील विकासकामांसाठी अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयांसाठी अनुक्रमे २३ कोटी २६ लाख, ११ कोटी ७६ लाख, २१ कोटी ६६ लाख, ३८ कोटी ४३ लाख, १३ कोटी ०२ लाख, ३५ कोटी २५ लाख, १६ कोटी ५१ लाख, ३२ कोटी ७ लाख रुपये इतकी तरतूद केली आहे.

वारकरी भवन, अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते -२०२४-२५ या आर्थिक वर्षात महानगरपालिकेने महत्वाचे उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये मालमत्ता हस्तांतरण प्रक्रिया पारदर्शी व जलदगतीने करणे, शहरातील व्यावसायिकांसाठी शासन मान्यतेनुसार अभय योजना लागू करणे, शहरी विकास योजनेंतर्गत ६१ किमी लांबीचे रस्ते विकसित करणे, नागरिकांच्या सोयीसाठी अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार रस्ते विकसित करणे, मुळा नदीवरील सांगवी-बोपोडी दरम्यान पुल उभारणी करणे, सांगवी फाटा ते किवळे रस्त्यावर रक्षक चौक येथे सबवे उभारणे, पवना नदीवर मामुर्डी-सांगवडे दरम्यान पुल बांधणे, मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करणे, बीआरटीचे जाळे वाढविणे, हरित सेतु प्रकल्पाचा मास्टर प्लॅन तयार करणे, ७०० खाटांचे ८ मजली सुसज्ज मोशी हॉस्पिटल, वारकऱ्यांच्या निवासाची सोय करण्याकरिता वारकरी भवन उभारणे अशा महत्वाच्या प्रकल्पांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. शिवाय नदी पुनरूज्जीवन प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातंर्गत विविध कामे, मैला शुद्धीकरण प्रकल्प, पाणीपुरवठाविषयक बाबींसाठी आवश्यक कामे करणे, पीपीपी तत्वावर थेरगाव रुग्णालयाजवळ नव्याने ६० खाटांचे कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन यावर्षी आखण्यात आले आहे.

प्रत्येक प्रभागामध्ये १ अशा एकूण ८ इंग्रजी माध्यमांचे वर्ग महापालिका शाळांमध्ये सुरू करण्याचे देखील नियोजन असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी सांगितले. तसेच विविध अग्निशमन केंद्रांची उभारणी तसेच आवश्यक अग्निशमन सामग्री खरेदी करण्यात येणार असून अग्निशमन यंत्रणा भक्कम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या ६८ शाळांना अद्यावत भौतिक सुविधा पुरवून आदर्श शाळा म्हणून रुपांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी महापालिका विविध योजना राबवित असून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी काळभोरनगर आणि आकुर्डी येथे मॉल उभारून ते बचत गटांना चालविण्यास देण्यात येणार आहे. या माध्यमातून महिला सक्षमीकरणासह दिव्यांग नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यावर महापालिकेने भर दिला आहे. करसंकलन विभागाच्या सर्व रेकॉर्डचे स्कॅनिंग व डिजीटलायझेशन करण्यात येणार आहे. सार्वजनिक खासगी भागिदारीतून सिटी सेंटर, मोशी स्टेडियम आणि कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम उभारण्याचे प्रयोजन आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMuncipal Corporationनगर पालिका