शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

‘बीआरटी’चा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 04:50 IST

निगडी ते दापोडी मार्गावर बस रॅपिड ट्रान्सपोेर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्गिका हा प्रकल्प उभारून तीन वर्षे उलटली, तरी ही मार्गिका सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही.

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : निगडी ते दापोडी मार्गावर बस रॅपिड ट्रान्सपोेर्ट सिस्टीम (बीआरटीएस) मार्गिका हा प्रकल्प उभारून तीन वर्षे उलटली, तरी ही मार्गिका सुरू होण्यास अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. दरम्यान, आता पुण्याहून पिंपरीपर्यंतच्या मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात येत आहे.एकीकडे मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला असताना बीआरटीएस मार्गिकेच्या उद्घाटनाचा मुहूर्त मात्र लांबणीवरच पडत आहे. त्यामुळे आता तरी बीआरटीएस मार्गिका सुरू होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार, की उद्घाटनाबाबत केवळ ‘तारीख पे तारीख’ ऐकायला मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाआहे.पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसचा प्रवास जलद व विनाअडथळा व्हावा, यासाठी शहरात बस रॅपिड ट्रान्सपोेर्ट सिस्टीम (बीआरटीएस) प्रकल्प हाती घेण्यात आला. या प्रकल्पातील शहरात निगडी-दापोडी, किवळे-सांगवी, देहू-आळंदी रस्ता ते काळेवाडी आणि नाशिक फाटा-वाकड या मार्गांवर ‘बीआरटीएस’चे काम हाती घेण्यात आले.दरम्यान, प्रशस्त रस्ते असताना बीआरटीएस कशासाठी, यावरून या प्रकल्पाला विरोध करण्यात आला. मात्र, तरीही प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले. निगडी-दापोडी या मार्गिकेचे काम २०१४ मध्ये सुरूकरण्यात आले. या मार्गावर मधोमध ग्रेड सेपरेटर, शेजारी बीआरटीएस मार्गिका आणि त्यानंतर सेवा रस्ता अशी रचना करण्यात आली. दरम्यान, ग्रेड सेपरेटरमधून बाहेर पडण्यास ‘मर्ज आऊट’, तर आत जाण्यास ‘मर्ज इन’ करण्यात आले. मात्र, ग्रेड सेपरेटरमधून सेवा रस्त्यावर येताना बीआरटीएस मार्गिकेचा अडथळा येत असल्याने अपघाताची शक्यता वर्तविलीजात आहे. तसेच या मार्गिकेवरील थांब्यावर उतरणारे प्रवाशांना धोकादायकरीत्या सेवा रस्ता ओलांडावा लागणार, असाही मुद्दा उपस्थित झाला. दरम्यान, निगडी ते दापोडी या मार्गिकेवर दोन्ही बाजूने बसथांबे उभारण्याचे नियोजन आहे.मेट्रोच्या कामामुळे वाढली प्रतीक्षामेट्रोच्या कामासाठी खराळवाडी ते दापोडीपर्यंत पुणे-मुंबई महामार्गावर तसेच ग्रेड सेपरेटरमधील दुभाजकांवर पिलर उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत वाहतूक पोलिसांनी बदल केले असून काही मार्ग बंद केले आहेत. ग्रेड सेपरेटरमधील एका लेनवरून दोन वाहने जात असतात. मात्र, एका लेनमधील अर्ध्या जागेवर मेट्रोच्या कामासाठी बॅरिकेडस उभारण्यात आल्याने लेनमधून एकच वाहन जात आहे. यामुळे ग्रेड सेपरेटरमधील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.त्यामुळे अनेक जण सेवा रस्त्याचा वापर करत असून यामुळे सेवा रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. खासगी वाहनांसह पीएमपी बसेसचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. अशावेळी बंद असलेल्या बीआरटीएस मार्गिकेमधून बसेस धावल्यास सेवा रस्त्यावर पुरेशी जागा उपलब्ध होईल.चारचाकींचा शिरकाव : लोखंडी खांबही तुटलेबीआरटीएस मार्गिकेवरील लोखंडी खांबही तुटले बीआरटीएसच्या उद्घाटनास अवधी लागणार असल्याने काही दिवसांपूर्वीच ही मार्गिका केवळ दुचाकीसाठी खुली करण्यात आली. केवळ दुचाकीच आतून जाव्यात यासाठी मार्गिकेत आत प्रवेश करण्याच्या ठिकाणी लोखंडी खांब उभारण्यात आले. यामुळे दुचाकी या मार्गिकेतून जाऊ लागल्या. मात्र, आता प्रवेश करण्याच्या ठिकाणी असलेले लोखंडी खांबही तुटले आहेत.निगडी-दापोडी बीआरटीएस मार्गिकेची बांधणी झालेली आहे. केवळ काही बसथांब्यांची उभारणी तसेच इतर किरकोळ कामे उरली आहेत. मेट्रोच्या कामाचा कसलाही अडथळा निर्माण होणार नाही. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही मार्गिका सुरू होईल.- विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस