शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला आला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:31 IST

गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका रस्त्यावरील रखडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले.

- अतुल क्षीरसागररावेत - गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका रस्त्यावरील रखडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले़ वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या जागेचे संपादन झालेले नाही. रस्त्याला बाधित ठरणारी घरे एक वर्षांपूर्वी जमीनदोस्त करून रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा ताब्यात घेऊन अर्धवट रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.चिंचवड जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडीमधून जात असून, या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत होते. त्या हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरुवात होऊन पुढे रावेत प्राधिकरणाला मिळतो़ पुणे-मुंबई जाणाऱ्या लोकांसाठी सोईस्कर मार्ग आहे़ या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे़ या रस्त्याचे काम जवळपास सात वर्षांपासून सुरु आहे़ नवनगर विकास प्राधिकरणातील हद्दीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन ३१ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण झाले़ तेथून पुढील रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन महापालिकेकडून न झाल्यामुळे हा रस्ता अर्धवट अवस्थेत होता. या रस्त्याचा पूर्ण खर्च महानगरपालिका करणार होती; पण त्याची काही हद्द प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्यामुळे हा रस्ता प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला. या रस्त्याची पूर्ण लांबी ३.१५ किमी व रुंदी ३४.५ मी. असून प्राधिकरणाच्या हद्दीतील २.६३ किमी लांबी आणि अर्धा पूल बांधून पूर्ण झाले असून, महानगरपालिकेच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी येथील सुमारे ४०० मीटर पेक्षा जास्त जागेच्या भूसंपादनाचे काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे हा रस्ता खुला करण्यात आला नाही.रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ता पूर्ण झाला असून, तो वापरण्यायोग्य आहे असेही जाहीर करण्यात आले आहे व प्राधिकरणाची जबाबदारी त्यांनी पार पडली आहे. आता पालिकेच्या जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडून काम होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली होती. विकास आराखड्यानुसार रावेत ते चिंचवड जकात नाका मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाण ते नाल्यापर्यंतचा भाग नवनगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो या मार्गावरील २०० मीटर जागेचा ताबा अद्यापही प्रशासनाकडे नाही.सब-वेचे काम प्रगतिपथावरया रस्त्यालगत असणाऱ्या एकवीरा कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, नंदनवन या कॉलनीतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी येथे निर्माण होत असलेल्या पुलाखाली सब-वेची निर्मिती करण्यात येत आहे़ त्याचे काम प्रगतिपथावर आहे़ हा सब-वे पूर्ण झाल्यानंतर येथील रहिवाशांना रावेत आणि अन्य ठिकाणी ये-जा करण्यासाठी उपयोग होणार आह़ेमागील अनेक वर्षांपासून परिसराचा महापालिकेत समावेश करण्यात आला होता़ परंतु परिसराचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता़ आत्ता कोठे विकासाच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे़ प्रशस्त रस्त्यांची निर्मिती होत असल्याने विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षे मागास राहिलेला भाग आता विकसित होत आहे. महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाच्या वादात रस्त्याचे काम रखडल्यामुळे परत परिसर विकासापासून वंचित राहतो की काय असा प्रश्न नागरिकांच्या समोर होता़ परंतु आता मात्र तो प्रश्न सुटला आहे. - विनोद राठोड, सामाजिक कार्यकर्तेविकासाची गंगा परिसरात येत असताना प्रशस्त रस्त्यांमुळे परिसराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे़ परिसरात अनेक नामवंत शिक्षणिक संस्था आहेत़ त्यातच चांगल्या सुविधा प्रशासनाच्या वतीने पुरवत असताना हद्दीचा वाद महापालिका प्रशासन आणि प्राधिकरण प्रशासनाने आपापसात सोडवल्यामुळे अर्धवट अवस्थेत असणारे रस्त्याचे काम मार्गी लागत आहे.- आबा वाल्हेकर,अध्यक्ष, एकवीरा सेवा संघ

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड