शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

आरटीई अनुदानासाठी लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 03:16 IST

आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान

पुणे : आरटीई अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे शासनाकडून मिळणारे अनुदान बिल मंजूर करुन रक्कम अदा करण्यासाठी दीड लाख रुपयांपैकी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेचे कार्यालय अधीक्षक व क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सापळा रचून पकडले़ ही कारवाई सांगवी येथील नॅशनल इंग्लिश स्कूल कार्यालयात सकाळी करण्यात आली़कार्यालय अधीक्षक शिल्पा सुरेश मेनन (वय ४५, रा.फ्लॅट न २०३, रेणुका हेरिटेज, पर्वती) आणि क्लार्क महादेव मच्छिंद्र सारुख (वय ४७, रा़ यशवंतराव चव्हाणनगर बिल्डिंग ऩ क/३८ डहाणूकर कॉलनी, कोथरुड) अशी त्यांची नावे आहेत़तक्रारदार यांची शिक्षण संस्था असून त्यांच्या शिक्षण संस्थेत आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत शिकणाऱ्या मुलांचे अनुदान शासनाकडून मिळते़ शासनाचे हे अनुदान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत मंजूर केले जाते़ त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या अनुदानाचे १७ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्याचे काम शिल्पा मेमन यांच्याकडे होते़ हे बिल मंजूर करुन ती रक्कम देण्यासाठी मेमन यांनी दीड लाख रुपयांची (१० टक्के) लाच मागितली़ शिक्षण संस्थेच्या संचालकांनी याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती़ या तक्रारीची पडताळणी २५ मार्च रोजी करण्यात आली़ त्यात त्यांनी दीड लाख रुपयांपैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये घेण्याचे मान्य केले़ महावीर जयंती निमित्त सर्व शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने त्यांनी पैसे घेण्यासाठी गुरुवारी येणार असल्याचे सांगितले़ त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके, उत्तरा जाधव व त्यांच्या सहकाºयांनी सांगवीतील नॅशनल इंग्लिश स्कूल येथे सापळा रचला़ नॅशनल इंग्लिश स्कूलच्या कार्यालयात सकाळी येऊन शिल्पा मेमन व क्लार्क महादेव सारुख यांनी ५० हजार रुपये स्वीकारताच त्यांना पकडण्यात आले़सुटीच्या दिवशी करत होत्या लाचेची मागणीलाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून होणाºया कारवायांमुळे कार्यालय अधीक्षक शिल्पा मेमन या पैशांची मागणी करताना दक्षता घेत होत्या़ कार्यालयीन कामाच्या दिवशी त्या अशा कोणत्याही बाबींबाबत बोलत नसत़ सुटीच्या दिवशी आपल्यावर कारवाई होणार नाही, असे त्यांना वाटत होते़ त्यामुळे त्यांनी केलेल्या लाचेची मागणीची पडताळणीही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ मार्च रोजी रविवारी केली होती़ त्यात त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली होती़ गुरुवारी महावीर जयंतीची सुटी असल्याने त्यांनी कोणाला आपल्या कार्यालयात न बोलवता थेट संस्थेच्या कार्यालयात येणार असल्याचा निरोप दिला़ त्यानुसार त्या सकाळी सव्वानऊ वाजताच कार्यालयात पोहोचल्या होत्या़ पण, दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकही तयारीत असल्याने सुटी असतानाही त्यांनी सापळा रचून त्यांना रंगेहाथ पकडले़