शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 03:26 IST

नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम व गुलाब पुष्प उद्यानालगतच्या नाल्यात पोत्यात भरून टाकलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी दुपारी ३ च्या सुमारास आढळून आला

पिंपरी : नेहरुनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम व गुलाब पुष्प उद्यानालगतच्या नाल्यात पोत्यात भरून टाकलेला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह रविवारी दुपारी ३ च्या सुमारास आढळून आला. अंदाजे ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत खून झाला असल्याची शक्यता वर्तविली आहे. मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.दुपारी ३ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला काही नागरिकांनी नेहरुनगरच्या घटनेची माहिती दिली. माहिती कळताच, परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे मसाजी काळे, सहायक पोलीस निरीक्षक गजानन कडाळे, राजू ठुबल, पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, ईश्वर जगदाळे, पवन पाटील, सागर पाटील, हरिदास बोचरे, शरद आहेर यांच्या पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने नाल्यात उतरून पोत्यातील मृतदेह बाहेर काढला. रुग्णवाहिकेतून तो उत्तरीय तपासणीसाठी वायसीएम रुग्णालयात नेला. पोलीस आले, त्या वेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नाल्यालगत रहिवासी वस्ती आहे़ पोलिसांनी आजूबाजूच्या रहिवाशांकडे या घटनेबद्दल काही माहिती आहे का? याची चौकशी केली. ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला. पिंपरी पोलीस ठाणे आणि भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या हद्दीच्या अगदी सीमेवर हा मृतदेह आढळूनआल्याने पोलिसांचा हद्दीचा मुद्दा उपस्थित झाला. मात्र, दोन्ही पोलिसांनी एकत्रित येऊन पुढील कार्यवाही केली.दोन महिन्यांतील आठवा खूनआॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात ३ सप्टेंबरला स्वाती संजय वाघोलीकर या तरुणीचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. २१ आॅगस्टला शंकर झेंडे यांचा डोक्यात प्रहार करून खून केल्याचे उघडकीस आले. निगडी येथे ही घटना घडली. आरोपींनी अपघात घडल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता. दुचाकीची चावी दिली नाही म्हणून बालाजीनगर येथे २८ आॅगस्टला सतीश इंदले या तरुणाचा खून झाला. आॅगस्ट महिन्यातील खूनसत्र संपले नाही तोच सप्टेंबरच्या सुरुवातीला १२ सप्टेंबरला वाकड येथे महेश वाळवे या तरुणाचा पाचशे रुपये उसने देण्यास नकार दिला म्हणून खून करण्यात आला.२ सप्टेंबरला आदित्य जैद या विद्यार्थ्यांचा खून झाला. काही दिवस उलटले नाही तोच १३ सप्टेंबरला सुभान शेख ऊर्फ शाबीर अमीन सोलंकी या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. २५ सप्टेंबरला विद्यानगर येथे डोक्यात दगड घालून इम्रान मुसा शेख या तरुणाचा खून झाला. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात राम सनेही या परप्रांतीय कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. या खून प्रकरणाने सप्टेंबर महिना संपला़ मात्र, आॅक्टोबरच्या सुरुवातीस नेहरुनगर जवळील नाल्यात महिलेचा मृतदेह मिळाला. तिचा खून केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, खून सत्र थांबणार का? असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.