शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भावासाठी भाजपाच्या अधिकृत उमेदवाराची माघार

By admin | Updated: February 7, 2017 22:30 IST

भावासाठी भाजपाच्या अधिकृत उमेदवाराची माघार

 

महापालिका निवडणूकीत भोसरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक घडामोडी घडत आहेत. भारतीय जनता पक्षांतील जुन्या नव्यांचा वाद उफाळून आला आहे. शहरातील १२८ पैकी दोन जागांवर भाजपाने अर्ज मागे घेऊन अपक्षांना पुरस्कृत केले आहे. 

गवळीनगर प्रभागातील पºहाड यांनी भाजपाकडून  निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे एबी फॉर्म देखील सादर केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांना भाजपाच्या नेत्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली, असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. दरम्यान निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नव्याने पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यास विरोध केला जात आहे. आमदारांच्या भावासाठी पºहाड यांचा बळी दिला आहे, अशी चर्चा भोसरी विधानसभात मतदार संघात आहे. आमदार बंधू सचिन लांडगे हे भाजप पुरस्कृत उमेदवार झाले आहेत. 

रवी लांडगे बिनविरोध

भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतने प्रभाग क्रमांक सहामधून उमेदवारासाठी रवी लांडगे इच्छुक होते. चार दिवसांपूर्वी त्यांनी भोसरी विधानसभेतील भाजपाच्या नेतृत्वावर थेट टीका करून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे तक्रार केली होती. अंकुश लांडगेंच्या खून्याला भाजपातून उमेदवारी दिली जात आहे. ती देऊ नये, अशी मागणी केली होती. त्यामुळे उमेदवारीवरून भोसरीत दोन गट असल्याची चर्चा सुरू होती. रवी लांडगे यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर या प्रभागातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसेने उमेदवार दिले नव्हते. रवी लांडगेंना सहानुभूती मिळावा, यासाठी अंकुश लांडगे यांच्या जुन्या मित्रांनी येथून पक्षांची उमेदवार दिले नाहीत. तसेच आमदार लांडगे यांनीच बिवविरोधची खेळी खेळल्याचीही चर्चा भोसरीत आहे.

चिंचवडला झामा बारणेंना सेफ

थेरगावातील प्रभागातून राष्टÑवादीकडून उमेदवारी न मिळाल्याने आमदार लक्ष्मण जगताप समर्थक झामा बारणे यांनी भाजपात प्रवेश केला. याच प्रभागातून भाजपाच्या अधिकृत उमेदवार रेश्मा बारणे यांनी आश्चर्यकारकपणे माघार घेतली आहे. बारणे यांना भाजपा पुरस्कृत करण्याची चर्चा आहे.