शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संभाजीनगरच्या आरक्षित भूखंडावरून भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 00:25 IST

संभाजीनगर येथील बसस्थानकासाठी आरक्षित भूखंडाच्या भिंतीची तोडफोड करून विनापरवाना फूड फेस्टिव्हल आणि आठवडा बाजार भरविला जात आहे.

पिंपरी : संभाजीनगर येथील बसस्थानकासाठी आरक्षित भूखंडावर भाजपा नगरसेवक तुषार हिंगे यांनी अतिक्रमण केले आहे. त्यासाठी सीमाभिंतीची तोडफोड केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या व माजी महापौर मंगला कदम यांनी केला. त्यावर मी कोणत्याही प्रकारची सीमा भिंत तोडली नाही. अतिक्रमण केले नाही, परवानगी घेऊनच कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असे प्रत्युत्तर तुषार हिंगे यांनी दिले आहे.

संभाजीनगर येथील बसस्थानकासाठी आरक्षित भूखंडाच्या भिंतीची तोडफोड करून विनापरवाना फूड फेस्टिव्हल आणि आठवडा बाजार भरविला जात आहे. सीमाभिंत तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी महापौर कदम यांनी आयुक्तांकडे केली आहे.कार्यक्रम आयोजनावरून वाद : सीमाभिंत तोडल्याचा आरोपमंगला कदम यांची तक्रार मिळाली आहे. सीमाभिंत तोडल्याच्या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आधिका-यांना दिले आहेत.- श्रावण हर्डीकर, आयुक्तआम्ही सीमाभिंत तोडलेली नाही : तुषार हिंगे४महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून तीन दिवसांसाठी भूखंड वापराची परवानगी घेतली आहे. २४ डिसेंबरला क्षेत्रीय अधिकाºयांना पत्र दिले होते. उद्यापासून होणाºया फूड फेस्टिव्हलला अधिकृत परवानगी घेतली आहे. परवानगी घेऊनच फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरविण्यात येत आहे. कोणती सीमाभिंत तोडली, याचे पुरावे द्यावेत. आम्ही कोणतीही भिंत तोडली नाही. सीमाभिंत कोणी तोडली याची आपल्याला माहिती नाही. अतिक्रमणही केले नाही. मला आणि भाजपाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे.नगरसेवक व अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करा : मंगला कदमएमआयडीसी जी ब्लॉक येथील एचडीएफसी कॉलनीसमोर महापालिकेचा भूखंड आहे. बस टर्मिनलसाठी हा भूखंड आरक्षित आहे. मोक्याच्या ठिकाणचा हा भूखंड बळकाविण्यासाठी भाजपा नगरसेवकांने फूड फेस्टिव्हल आणि आठवडे बाजार भरविला आहे. हिंगे आणि महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक सुपेकर यांनी संगनमताने भूखंडाची सीमाभिंत तोडून जागेचे सपाटीकरण केले आहे. बस टर्मिनलचा भूखंड हस्तांतरित करताना महापालिकेने एमआयडीसीकडे कोट्यवधी रुपयांचे विकसनशुल्क भरले आहे. भूखंडावर अतिक्रमण होऊ नये याकरिता लाखो रुपये खर्च करुन सीमाभिंत बांधली आहे. परंतु, संरक्षणभिंत तोडून भूखंड बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोघांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. अन्यथा आंदोलनाचा इशारा मंगला कदम यांनी दिला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड