शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 03:25 IST

महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा व सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विषय समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले नसल्याने सर्वंच समित्यांवर भाजपाचे सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे.

पिंपरी - महापालिकेच्या विधी, महिला व बाल कल्याण, शहर सुधारणा व सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी विषय समिती सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी बिनविरोध झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले नसल्याने सर्वंच समित्यांवर भाजपाचे सभापती बिनविरोध निवडून आले आहेत. विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीच्या सदस्यांची मुदत संपली होती. त्यांच्या जागी नवीन नगरसेवकांची मागील महिन्यातील सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. महापालिकेतील पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली आहे. त्यानंतर अर्ज करणे, माघारीनंतर आज निवडणूक झाली.विरोधी पक्ष राष्ट्रवादीने अर्ज भरला नसल्याने सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध झाली. विधी समिती सभापतिपदी भाजपाच्या माधुरी कुलकर्णी, महिला व बाल कल्याण समिती सभापतिपदी स्वीनल म्हेत्रे, शहर सुधारणा समितीच्या सभापतिपदी सीमा चौगुले आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या सभापतिपदी संजय नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी कामकाज पाहिले. निवडीनंतर महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांनी सभापतींचा सत्कार केला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या