शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

भाजपा नगरसेवकास अभय? महापालिका प्रशासनाकडून कारवाईस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 04:21 IST

पिंपरी महापालिकेतील भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जातप्रमाणपत्र पडताळणी दाखला अवैध ठरविल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून पद रद्द करण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे.

पिंपरी : पिंपरी महापालिकेतील भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांचा जातप्रमाणपत्र पडताळणी दाखला अवैध ठरविल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून पद रद्द करण्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावता यावेत, यासाठी महापालिका प्रशासन वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याची चर्चा महापालिकेत होती.पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत झाली. चिखली प्रभाग क्रमांक एकमधून कुंदन गायकवाड हे भाजपाच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी गायकवाड यांच्या जातदाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल्यावर हरकत घेतली. त्यावर गायकवाड यांचा जात दाखला अवैध असल्याचा निर्णय बुलडाणा जिल्हा विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी दिला आहे. गायकवाड यांनी खोटी, बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक केली असून, त्यांच्याविरोधात कारवाई करावी, असा आदेशही दिला आहे.गायकवाड यांचा जातीचा दावा अवैध ठरविल्यानंतर त्वरित त्यांचे पद रद्द करणे बंधनकारक असताना प्रशासकीय कारण पुढे करून अधिकारी कारवाईस टाळाटाळ करीत असल्याची चर्चा आहे. निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त तर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे घरी गेले. राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या नगरसेवकांना जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा करण्याची अंतिम मुदत मंगळवारी होती. भाजपाच्या दोन नगरसेवकांनी दाखला दिला नाही. त्यांच्या वकिलाने स्थगिती मिळाल्याचे पालिकेला कळविले. मात्र, लेखी काही सादर केले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला आहे.उच्च न्यायालयातून स्थगितीसाठी प्रयत्नपुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी तीन नगरसेवकांनीमुदतीत जातपडताळणी दाखला सादर केला नाही त्यांचे नगरसेवकपद रद्द केले. मात्र, पिंपरीचे प्रशासन कारवाई का करीत नाही, या विषयी चर्चा आहे. स्थायी समिती सदस्य असलेले गायकवाड हे साप्ताहिक सभेला उपस्थित नव्हते.बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या निर्णयास नागपूर उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले. त्यांना वेळ मिळावा, यासाठी प्रयत्न केला जात असल्याची चर्चा रंगली आहे.