भोसरी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आदर्श समाज विकास संघ इंद्रायणीनगर, भोसरी यांच्या वतीने विद्रोही कवी सचिन माळी व क्रांतिशाहीर शीतल साठे यांच्या नवयान विद्रोही महाजलसा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान सचिन माळी म्हणाले, ‘‘आम्ही गेल्या १० ते १२ वर्षांपासून या शाहिरी जलशाच्या माध्यमातून अहिंसक पद्धतीने कविता, गाणी व पथनाट्याद्वारे समाजात जागृती व प्रबोधन करण्याचे काम करीत आहोत. आमचा हा पिंपरी-चिंचवड शहरातील पहिलाच कार्यक्रम असून, सर्व नागरिकांनी यासाठी सहकार्य केले. सर्व जातिधर्माच्या बेड्या तोडून समता, बंधूता व विकास हेच आपल्या समाजाचे ब्रीद असले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी या वेळी केले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाऊसाहेब डोळस यांनी भुषवले. तसेच माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक संजय वाबळे, सुरेश कसबे, योगेश लोंढे, सतीश थिटे, देवेंद्र तायडे, किशोर मांदळे, अभिमन्यू पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले, तसेच व्यवस्थापन संयोजन समितीने केले. या वेळी विविध कार्यक्रम घेण्यात आले. (वार्ताहर)
भोसरीत रंगले विद्रोही कविसंमेलन
By admin | Updated: April 29, 2017 04:08 IST