शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भाऊसाहेब भोईर, विनोद नढे यांची ‘घरवापसी’

By admin | Updated: November 28, 2015 00:39 IST

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पक्षाने अखेर मागे घेतली आहे.

पिंपरी : काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते विनोद नढे यांच्यावरील निलंबनाची कारवाई पक्षाने अखेर मागे घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला. भोईर, नढे यांच्या ‘घरवापसी’मुळे शहर काँगे्रसला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत कलह सुरू झाला होता. त्यावरून काँग्रेसचे नगरसेवकही भोईर आणि शहराध्यक्ष सचिन साठे अशा दोन गटांत विभागले गेले. या सर्व घडामोडीनंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भाऊसाहेब भोईर आणि विरोधी पक्षनेते विनोद नढे यांना फेब्रुवारी २०१५ मध्ये पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँगे्रसची ताकत वाढविण्यासाठी पक्षनेतृत्वाने शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँगे्रसचे नेते शहरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. गट-तट न ठेवता पक्षाचा विस्तार व्हावा यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे दहा महिन्यांनंतर भोईर व नढे यांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी गुरुवारी भोईर व नढे यांचे निलंबन मागे घेतले आहे. (प्रतिनिधी)