वडगाव मावळ : डी. वाय. पाटील स्पोटर््स अकॅडमी व डी. वाय. पाटील एजुकेशनल अकॅडमी (आंबी) आयोजित राजवीर करंडक २०१६ क्रिकेट स्पर्धेत भारती विद्यापीठ अभियांत्रिकी संघाने डीवाय पाटील स्पोटर््स अकॅडमीचा ११ धावांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले. ट्रिनिटी अकॅडमीने तिसरा क्रमांक मिळविला. प्रथम फलंदाजी करताना भारती विद्यापीठ संघाने दोन बाद १५८ धावा केल्या. प्रतीक पाटील (नाबाद ६८) व प्रसाद शिर्के (नाबाद ६४) यांनी धावसंख्येस आकार दिला. १५८ धावांचा पाठलाग करताना डीवाय पाटील संघ २० षटकांत ९ बाद १४७ धावा करू शकला. यात अभिजित भोग (२९), ललित पवार (२९) आणि शुभम चैधारी (२३) यांचे प्रयत्न अपयशी ठरले.बक्षीस वितरण समारंभ डीवाय पाटील एज्युकेशनल अकॅडमीचे प्रमुख डॉ. विजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुशांत पाटील, डॉ. व्ही. एस. साळुंखे, भगवान गायकवाड, शिवराज उगले, प्राचार्य डॉ. एस. डी. शिरबहादूर, डॉ. आर. जे. पाटील, डॉ. व्ही. एन. नितनवरे, डॉ. धर्माधिकारी, डॉ. जोशी, एस. एस. भगत, विवेक तिळवे उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा. अक्षय काशीद यांनी केले. प्रा . विशाल वाळुज, सतीश ठाकर, डॉ. सौरभ देशमुख व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
भारती विद्यापीठ अजिंक्य
By admin | Updated: April 4, 2016 01:15 IST