शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पाणीकपात मागे

By admin | Updated: June 13, 2017 04:17 IST

पावसाळा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील दिवसाआड पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. शहरात मंगळवारपासून नियमित पाणी पुरवठा करण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पावसाळा सुरू झाल्याने पिंपरी-चिंचवडमधील दिवसाआड पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. शहरात मंगळवारपासून नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने महाराष्ट्र दिनानंतर दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. पवना धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणी कपातीसाठी आग्रही असणाऱ्या महापौरांना विरोधकांनी लक्ष्य केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाणीकपातीला विरोध केला होता. टँकर लॉबीसाठी पाणीकपात केली जात आहे, असा आरोप केला होता. पाऊस लांबणीवर पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, म्हणून पाणीकपात केल्याचे महापौरांनी सांगितले होते. पाऊस सुरू झाल्यास कपात मागे घेऊ,असेही जाहीर केले होते. गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. याबाबत महापालिकेत सोमवारी बैठक घेण्यात आली. या वेळी सभागृहनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पाणी पुरवठा विभागाचे सहशहर अभियंता रवींद्र दुधेकर, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रवीण लडकत आदी उपस्थित होते.एकनाथ पवार म्हणाले, ‘‘एक महिन्यापूर्वी पाणीकपात केली होती. महिनाभरामध्ये चार टक्के पाणी वाचले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. आगामी काळात पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये. यासाठी पाणीकपात करणे गरजेची आहे. त्यामुळे दहा टक्के पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. मंगळवारपासून शहरवासीयांना दररोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.’’पवना धरणात ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने एक महिन्यापूर्वी म्हणजेच २ मेपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेने दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. पावसाला सुरुवात झाली आहे. धरणात २३ टक्के पाणीसाठा आहे. परंतु, पावसाने ओढ दिल्यावर पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी केवळ १० टक्के पाणीकपात कायम ठेवून मंगळवापासून नियमित एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा.- नितीन काळजे, महापौर