शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता जारी होताच फ्लेक्स काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 02:45 IST

महापालिका प्रशासनाची कार्यवाही; संकेतस्थळावरील राजकीय छायाचित्रे गायब

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होताच महापालिका परिसरातील फ्लेक्स काढण्यास सुरुवात झाली आहे. जाहिरात संस्थांची बैठक घेऊन फ्लेक्स काढण्याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सूचना केल्या आहेत. महापालिकेतील आचारसंहिता कक्षाच्या वतीने कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार परवाना विभागाच्या वतीने फ्लेक्सवर कारवाई केली जाणार आहे.केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता रविवारी जारी केल्यानंतर शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या पहिल्या दिवशी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आचारसंहिता कक्ष कार्यान्वित केला आहे. तसेच महापालिका आयुक्तांनी चौथ्या मजल्यावरील दालनात आज बैठक घेतली. त्या वेळी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांच्यासह शहरातील जाहिरात संस्थांचे प्रमुख उपस्थित होते. या वेळी आयुक्तांनी आचारसंहिता कालखंडात काय करावे किंवा काय करू नये, अशी माहिती दिली.राजकीय फलक झाकलेदरम्यान, नगरसचिव कार्यालयाच्या वतीने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तारूढ पक्षनेते, विविध समितींचे सभापती यांच्या कार्यालयातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे कागदाने झाकली आहेत. तसेच काही पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे काढून टाकली आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे कागदाने झाकली आहेत. तसेच महापालिकेतील १४ पदाधिकाऱ्यांची वाहने जमा केली आहेत, अशी माहिती नगरसचिव उल्हास जगताप यांनी दिली.आचारसंहिता जारी झाल्यानंतर २४ तासांच्या आत फ्लेक्स काढून घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिल्यानंतर शहरातील राजकीय फलक काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न केले जात होते. तसेचराजकीय लोकांच्या वतीनेही शहरातील बहुतांश फ्लेक्स काढून घेण्याचे काम सुरू होते.महापालिकेच्या संकेतस्थळावर महापौर राहुल जाधव, विविध पदाधिकारी यांची छायाचित्रे आहेत. राजकीय नेत्यांची छायाचित्रे काढून टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी संगणक विभागाला केल्या होत्या त्यानुसार छायाचित्रे काढून टाकली आहे.तातडीने कार्यवाही करण्याचे आदेशशासकीय संपत्तीच्या विद्रूपीकरणावर निर्बंध येणार आहेत. सर्व शासकीय कार्यालये आणि परिसरामधील कार्यालयीन इमारतींचा यात समावेश होतो. शासकीय संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, बॅनर, झेंडे, पेपर आदी २४ तासांच्या आत काढून टाकण्यात येणार आहेत. शासकीय संपत्तीचे विद्रूपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर यामध्ये सार्वजनिक संपत्तीच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर, बॅनर, झेंडे, पेपर अशा जाहिराती काढून टाकाव्यात. सार्वजनिक ठिकाणे म्हणजेच रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बस, विजेचे खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज संस्थेच्या इमारतीवरील अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणुका जाहीर झाल्यापासून ४८ तासांच्या आत काढून टाकाव्यात. तसेच खासगी संपत्तीचे विद्रूपीकरण खासगी संपत्तीवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती निवडणूक जाहीर झाल्यापासून ७२ तासांमध्ये काढून टाकाव्यात. त्यामुळे आचारसंहितेची कार्यवाही सुरू केल्याचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड