तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे येथे नगराध्यक्षांचे पती संदीप जगनाडे आणि तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल यांच्यात निवडणूक खर्चाच्या वादातून सोमवारी (दि. ०६) सकाळी धक्काबुक्की झाल्याचे समजते. यात ओसवाल यांच्या बोटाला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.संदीप जगनाडे हे भाजपच्या नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांचे पती आहेत. जगनाडे व ओसवाल यांच्यात सकाळी घरासमोरील रस्त्यावर जोरदार वाद झाला. वाद विकोपाला जाऊन प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत पोहोचले. त्यात मोटारसायकल पडताना ओसवाल यांच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन रक्त आले, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. यासंदर्भात प्रकाश ओसवाल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. जगनाडे यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण किरकोळ होते. ते सकाळीच मिटले असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष निवडणुकीच्या खर्चाबाबत जगनाडे व ओसवाल यांच्यात जुना वाद असल्याचे समजते. ओसवाल हे सकाळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांना अभिषेक करण्यासाठी निघाले असताना, मॉर्निंग वॉकला निघालेले जगनाडे त्यांना दिसले. दोघे समोरासमोर आल्याने वादाची ठिणगी पडली आणि त्याचे पर्यवसान धक्काबुक्कीत झाल्याचे समजते.
तळेगाव दाभाडेला निवडणूक खर्चाच्या वादातून माजी सभापतीचा वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 13:31 IST
तळेगाव दाभाडे येथे नगराध्यक्षांचे पती संदीप जगनाडे आणि तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रकाश ओसवाल यांच्यात निवडणूक खर्चाच्या वादातून सोमवारी (दि. ०६) सकाळी धक्काबुक्की झाली.
तळेगाव दाभाडेला निवडणूक खर्चाच्या वादातून माजी सभापतीचा वाद
ठळक मुद्देसंदीप जगनाडे हे भाजपच्या नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांचे पती जगनाडे व ओसवाल यांच्यात सकाळी घरासमोरील रस्त्यावर जोरदार वाद