शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

गावी जाताय, चोरट्यांपासून सावधान! पोलिसांतर्फे सतर्कतेचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 01:52 IST

दिवाळीच्या सुटीत घर बंद ठेवून अनेकजण आपापल्या मूळ गावी जातात. परंतु गावी जात असताना चोरी होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पिंपरी : दिवाळीच्या सुटीत घर बंद ठेवून अनेकजण आपापल्या मूळ गावी जातात. परंतु गावी जात असताना चोरी होणार नाही, याची योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.सुटीच्या काळात अनेक दिवस घर बंद ठेवून गावी जात असताना, शेजाऱ्यांना याबाबत कल्पना द्यावी. अधिक कालावधीसाठी गावी जायचे असेल, तर रोख रक्कम, तसेच मौल्यवान वस्तू, दागिने घरात ठेवून जाऊ नये. तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक दिवस सलग घर बंद असेल, तर चोरटे अशा घरांवर पाळत ठेवतात. बंद घर असलेल्या परिसरातील आणखी काही लोक त्याच कालावधीत गावी गेले असतील, तर चोरट्यांना चोरी करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होत असते. सोसायटीतील एखाद-दुसरे कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले असेल, तर बंद घर असल्याचे सहज लक्षात येत नाही. परंतु एकाच वेळी सोसायटीतील अनेक सदनिका बंद असतील, तर त्या ठिकाणी चोरी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेजाºयांना कल्पना देऊन, तसेच आपण ज्या ठिकाणी जात आहे, त्या ठिकाणाची माहिती सोसायटीच्या व्यवस्थापकास द्यावी. अनोळखी रखवालदारावर विश्वास ठेवू नये. त्यांना कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. ही दक्षता घेतल्यास बंद सदनिकांतील चोरीच्या घटना टाळता येतील.सोशल मीडियावर फोटोव्हायरल करण्याचे टाळावेमूळ गावी अथवा पर्यटनाला गेल्यास लगेच प्रत्येक क्षणी आपले फोटो व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांवर अपलोड करण्याचे टाळावे, असेही पोलिसांनी सूचित केले आहे. पर्यटन स्थळी अथवा गावी गेले असल्यास कुटुंबासह तेथील छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केल्यास चोरट्यांना त्याची माहिती मिळते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड