शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग

By admin | Updated: December 22, 2015 23:54 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला आणखी वर्षापेक्षा अधिक अवधी आहे. मात्र निवडणुकीसाठी उतावळलेल्या इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे

रहाटणी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीला आणखी वर्षापेक्षा अधिक अवधी आहे. मात्र निवडणुकीसाठी उतावळलेल्या इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. शहरातील वॉर्डात हे स्वयंघोषित उमेदवार सक्रीय झाले आहेत. दररोज आपल्या पद्धतीने प्रचार करण्यास सुरुवात केली असली, तरी त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे. सध्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे व्हॉट्स अपवर अनेकांना शेकडो मेसेज मनात नसतानासुद्धा वाचावे लागत आहेत.निवडणुकीतील इच्छुक आता विविध कार्यक्रमांचे आयोजन करून तुमच्या सुख-दु:खात सहभागी असल्याचा देखावा करीत गल्लोगल्ली फिरत आहेत. कोणत्याही पक्षाचे राज्य पातळीवरील नेते या भागात आले असता, संबंधित इच्छुक त्यांच्यामार्फत मनधरणी करण्याचा प्रयत्नही करीत आहे. सकाळीच गुडमॉर्निंग ,नमस्कारचा मेसेज व्हॉट्स अपवर झळकत असल्याने नागरिक कमालीचे हैराण आहेत. आत्तापासूनच वॉर्ड झाले, तर कशा प्रकारे निवडणूक लढवायची किंवा प्रभाग झाले तर कसे चित्र राहील याची बांधणी केली जात आहे. मागच्या वेळेस निवडणुकीत हारलेले उमेदवार नवीन युक्त्या वापरीत मतदारांपर्यंत पोहोचत आहेत, तर नवीन विविध पक्षांचे कार्यकर्ते तर कधी निवडणूक येईल, इतके उतावीळ झाले आहेत. पैसा कितीही गेला तरी चालेल, पण निवडणूक लढविणारच असा चंग अनेकांनी बांधला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीला वर्षभराचा अवधी शिल्लक असला, तरी सद्य:स्थितीचा विचार केला असता, अंतर्गत कलह मात्र सर्वच पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. अनेक कार्यकर्ते सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’च्या भूमिकेत असल्याचेही दिसत आहे. (वार्ताहर)