शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
4
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
5
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
6
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
7
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
8
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
9
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
10
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
11
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
12
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
13
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
14
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
16
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
17
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
18
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
19
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
20
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
Daily Top 2Weekly Top 5

३४ रुपयांचा दाखला मिळतोय बाराशेला; अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पैसे उकळण्याचा गोरखधंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 06:19 IST

महाविद्यालय व शाळा प्रवेशासाठी आवश्यक असलेला रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, जातीचा व नॉन क्रिमिनल दाखला घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची आकुर्डीतील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी आहे.

- पराग कुंकूलोळ 

चिंचवड : महाविद्यालय व शाळा प्रवेशासाठी आवश्यक असलेला रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, जातीचा व नॉन क्रिमिनल दाखला घेण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांची आकुर्डीतील तहसील कार्यालयाच्या ठिकाणी गर्दी आहे. मात्र, प्रमुख अधिका-यांचे येथे कोणतेही नियंत्रण नसल्याने दाखले देण्याची व्यवस्थेवर एजंटांनी ताबा मिळविला असून, विद्यार्थी व पालकांची लूट सुरू आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये हा गंभीर प्रकार समोर आला आहे. शासकीय दरपत्रकानुसार ३० ते ४० रुपयांना मिळणाºया दाखल्यासाठी १२०० ते १५०० रुपये उकळण्याचा गोरखधंदा सुरू आहे. एजंटांचे अधिकाºयांशी लागेबांधे असल्याने जादा पैसे मोजणाºयांना तातडीने दाखले मिळत असून, सरळमार्गी जाणाºयांना हेलपाटे मारावे लागत आहेत.

- आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात असणाºया अप्पर तहसीलदार कार्यालयात विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रवेश करताच काय काम आहे याची विचारपूस करण्यासाठी सहा एजंट उभे होते. येथे येणाºया प्रत्येकाला अर्जंट काम करून हवे आहे का, असे विचारत होते. सरकारी फी भरून ३४ रुपयांत मिळणारा उत्पन्नाचा दाखल अर्जंट काढून देण्यासाठी बाराशे ते पंधराशे रुपये खर्च असल्याचे सांगत दोन दिवसांत काम करून देतो, असे संभाषण सुरू झाले.

- सरकारी कार्यालयातील अनियोजित कामकाजामुळे वैतागलेले नागरिक त्यांच्या जाळ्यात फसत असल्याचे वास्तव मंगळवारी दुपारी ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे.सध्या महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारे विविध दाखले काढण्यासाठी नागरिकांची या कार्यालयात गर्दी होती. प्रवेशद्वारावर एजंट उभे होते. इथे येणाºया प्रत्येकालाच काय काम आहे असे विचारले जात होते. कोणता दाखला काढायचा आहे, त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व खर्च सांगितला जात होता.

- कागदपत्रांची बॅग हातात घेऊन आलेल्या एका विद्यार्थ्याला प्रवेशद्वारावर एजंटने हटकले. रहिवासी दाखला काढायचा असल्याचे सांगत तो विद्यार्थी या एजंटच्या जाळ्यात फसला. कार्यालयात गेलास तर वीस-पंचवीस दिवस लागतील. गर्दी बघ किती आहे. तुला अर्जंट असेल तर मी दोन-तीन दिवसांत दाखला देऊ शकतो असे सांगितले. यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे झेरॉक्स करूनदेण्यास सांगितले. पंधराशे रुपयांत काम करून देतो. आता अ‍ॅडव्हान्स पाचशे रुपये दिले, तरी चालतील; बाकी पैसे दाखला मिळाल्यानंतर दे असे सांगण्यात आले.

- या विद्यार्थ्याने घरी फोन करून याची माहिती दिली. फोनवर बोलत असतानाच तो एजंटला घेऊन बाजूला निघून गेला.या घटनेनंतर ‘लोकमत’ प्रतिनिधीने कार्यालयाच्या र्पाकिंगमध्ये प्रवेश केला. येथे सुरू असणाºया कार्यालयात नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.बसण्यासाठी पुरेशी आसन व्यवस्था नसल्याने अनेकांनी जमिनीवर ठाण मांडले होते. काही ज्येष्ठ नागरिक जमिनीवर बसून अर्ज भरत होते, तर अनेक जण कागदपत्रांची जुळवाजुळव करीत होते. र्पाकिंगमध्ये उभ्या दुचाकीचा आधार घेऊन अनेक जण कागदपत्रांची चाचपणी करत होते. हेलपाटे मारूनही दाखल मिळत नसल्याने अनेक जण संतप्त होते.नागरिक एजंटच्या जाळ्यातविविध कामांसाठी लागणारे दाखले घेण्यासाठी सध्या नागरिकांची अप्पर तहसीलदार कार्यालयात गर्दी होत आहे. सरकारी फी भरून वेळेवर दाखले मिळत नसल्याने हताश झालेले नागरिक एजंटच्या जाळ्यात फसत आहेत. ज्येष्ठ नागरिक, रहिवासी, उत्पन्नाचा दाखला फी ३४ रुपये आहे. जातीचा व नॉन क्रिमिनल दाखला घेण्यासाठी ५८ रुपये फी आकारली जात आहे. मात्र कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असणारे एजंट या कामासाठी आठशे ते पंधराशे रुपये घेऊन अर्जंट दाखले काढून देतो असे सांगत असल्याने या कार्यालयातील पैसे उकळण्याचा हा गोरख धंदा सुरू असल्याच्या तक्रारी करीत आहेत.सरळमार्गी कामासाठी हेलपाटेअर्ज भरून पंचवीस दिवस झाले तरीही मला हेलपाटे मारावे लागत असल्याचे शंकर पाटील यांनी सांगितले. हेलपाटे मारूनही तांत्रिक अडचणी असल्याचे सांगितले जाते. अर्जात कागदपत्रांची कमतरता आहे. अधिकारी व्यस्त असल्याचे सांगत परत पाठविले जात असल्याची त्यांची तक्रार होती. अश्विनी पाटील ही विद्यार्थिनी रहिवासी दाखला घेण्यासाठी आली होती. मात्र कर्मचारी व्यवस्थित माहिती देत नसल्याची तक्रार ती करत होती. तुम्हाला मेसेज येईल असे सांगितले. मात्र मेसेज आलेला नाही. चौकशी करण्यासाठी आल्यावर आता काही सांगता येणार नाही, तुम्ही उद्या दुपारी या, असे सांगितले जात होते.अधिकाºयांशी लागेबांधेअप्पर तहसीलदार कार्यालयात अर्ज स्वीकृतीचे कामकाज एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. मात्र येथील एजंटचे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांशी लागेबांधे असल्याची चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिकांना संबंधित दाखले घेण्यासाठी अनेकदा चकरा माराव्या लागत आहेत. मात्र अतिरिक्त पैसे देऊन एजंट दोन ते तीन दिवसांत दाखला काढून देत असल्याने कार्यालयात मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.कार्यालयात सावळा गोंधळकार्यालयाच्या र्पाकिंगमध्ये अर्ज स्वीकृतीचे काम सुरू होते. या ठिकाणी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. एका कोपºयात काही कार्यालयीन कागदपत्रांचे गठ्ठे पडले होते. त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. दाखला स्कॅनिंगच्या पोचपावत्यांची पुस्तके, नागरिकांनी केलेल्या प्रतिज्ञापत्राचे गठ्ठे, जातीच्या दाखल्यांची कागदपत्रे, लाइट बिले व इतर अनेक कार्यालयीन कागदपत्रे येथे पडल्याचे दिसून आले.ाुरक्षेचा अभावअर्ज करण्यासाठी येथे नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक नागरिक रांगेत ताटकळत उभे होते. पाण्याची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली नव्हती. बाहेरील नागरिकांची आतमध्ये ये-जा सुरू होती. सुरक्षाव्यवस्था उपलब्ध नसल्याने रांगेत वाद सुरू होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड