शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा-शिवसेनेत जुंपली, चिंचवडमध्ये नवीन गृहप्रकल्पांना बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:27 IST

चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली.

पिंपरी - चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि शिवसेना नेत्यांमध्ये शुक्रवारी चांगलीच जुंपली.‘‘वाकडला कलाटेबंधूंचे पाण्याचे टँकर आहेत. दादागिरी करण्यातच त्यांच्या पिढ्या गेल्या आहेत. त्यामुळेच बिल्डरधार्जिण्यांना पोटशूळ उठला आहे,’’ असा आरोप आमदार आणि भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केला, तर चिंचवड मतदारसंघ कोणाची जहागिरी नाही. आमदारांनी दहशतीबाबत बोलणे हाच विनोद आहे, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी दिले आहे.नवीन बांधकामांना बंदी घालण्याचा ठराव भाजपाने केला आहे. त्यात फक्त चिंचवडचाच समावेश असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. बिल्डरांकडून फंड वसुलीसाठी हे धोरण अवलंबल्याची टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्या आरोपांना भाजपाने शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्यानंतर राहुल कलाटे यांनीही आरोप केले.दादागिरी करण्यात कलाटे बंधूंच्या पिढ्या गेल्या : लक्ष्मण जगतापगेल्या दहा वर्षांत चिंचवडला बांधकामे वाढली आहेत. त्याचा ताण सुविधांवर येत आहे. नागरिकांना दरडोई १३५ लिटर पाणी मिळणे आवश्यक आहे. पाण्याची कमतरता भासू नये. यामुळेच मोठ्या गृहप्रकल्पांना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय आहे. आरोप करणारे बांधकाम व्यावसायिकांना ब्लॅकमेल करत होते. ठेकेदाराला, महापालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतात. त्यांनी आजपर्यंत दादागिरी केली आहे. त्यांच्या पिढ्याच दादागिरी करण्यात गेल्या आहेत. भाजपाला फंडाची गरज नाही. प्रभागातील आरक्षणाचे ताबे पालिकेला देत नाहीत. अपयश झाकण्यासाठी बेछूट आरोप करून सवंग प्रसिद्धी मिळवितात, अशी टीका आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली.आमदारांनी दहशतीविषयी बोलणे मोठा विनोद : राहुल कलाटेवाकड येथील विकासकामांच्या भूमिपूजनानंतर आमदार बिथरले आहेत. शिक्षणाचा अभाव आहे. आमदार झाल्यावर ते बारावी पास झाले आहेत. व्हीजन नसल्याने कसलेही निर्णय घेत आहेत. एका मतदारसंघापुरती बंदी घालणे चुकीचे आहे. आमदारांनी दहशतीबाबत बोलणे म्हणजे हा मोठा विनोद आहे. दहशत म्हणजे काय असते हे देवकर, शितोळे यांना विचारले तर बरे होईल. माझा पाण्याचा टँकर असल्याचे आमदारांनी सिद्ध करून दाखवावे. ज्याची जास्त दहशत त्याला आमदारांकडून महत्त्वाचे पद दिले जाते, असा आरोप राहुल कलाटे यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा