शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 05:55 IST

राज्यातील बैलगाडा शर्यतींवर बंदी उठविण्यासाठी गाडामालक व शेतकºयांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्या वेळी अनेक शेतकºयांवर खटले

पिंपरी : राज्यातील बैलगाडा शर्यतींवर बंदी उठविण्यासाठी गाडामालक व शेतकºयांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. त्या वेळी अनेक शेतकºयांवर खटलेदाखल केले. मात्र, बैलगाडा बंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकार लवकरच घेणार असल्यामुळे संबंधित शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, अशी माहिती आमदार महेश लांडगे यांनी दिली.बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याबाबत राज्य सरकारने पाठविलेल्या विधेयकावर राष्ट्रपती यांनी नुकतीच स्वाक्षरी केली. केंद्र सरकारच्या गृहखात्याकडे संबंधित विधेयक दाखल झाले. त्यानंतर राज्यातील बैलगाडा मालकांवर दाखल केलेल्या खटल्यांबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी. संबंधित गाडामालक आणि शेतकºयांनी शांततेच्या मार्गाने आंदोलने केली आहेत. त्यामुळे संबंधित शेतकºयांवरील खटले मागे घ्यावेत, अशी मागणी आमदार लांडगे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात. या मागणीसाठी गेल्या ७ ते ८ वर्षांपासून विविध बैलगाडा मालक व प्रेमी संघटना तसेच सामान्य शेतकºयांनी सनदशीर मार्गाने खेड, शिरूर, आंबेगाव, चाकण, जुन्नर आदी भागांत प्रभावी आंदोलने केली. राज्यातील अन्य भागांतही आंदोलने करण्यात आली.