शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक विकासासाठी ‘प्राधिकरणा’चे विलीनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 02:02 IST

पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्यात येणार आहे.

पिंपरी : पुण्याच्या एकात्मिक विकासासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे (पीसीएनटीडीए) पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.पिंपरी-चिंचवड शहराची पालकमंत्री गिरीश बापट यांना अ‍ॅलर्जी आहे का, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसने केली होती. त्यामुळे चिंचवड येथे उभारलेल्या मदर तेरेसा उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री बापट आवर्जुन उपस्थित होते. दोन महिन्यांपूर्वी ‘लोकमत’ने पीएमआरडीएत प्राधिकरण विलीन होणार असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर भाजपाच्या शहरातील नेत्यांनी विलीनीकरण होऊ नये, अशी भूमिका मांडली होती; तर काँग्रेस, राष्टÑवादी, शिवसेनेनेही विलीनीकरणास विरोध केला होता. तसेच महापालिकेतच प्राधिकरणाचा समावेश करावा, अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडली होती.पीएमआरडीए आणि प्राधिकरण विलीनीकरणाबाबत भूमिका विचारली असता पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘पुण्याचा एकात्मिक विकास साधण्यासाठी पुणे महानगर नियोजन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच शहरात दोन प्राधिकरण कसे काय असतील? त्यातून विकास कसा काय साध्य होईल? पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा एकत्रित विकास व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्राधिकरणाचा समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत झाला आहे. प्राधिकरण आणि पीएमआरडीए विलीनीकरण काळाची गरज आहे.’’अनधिकृत बांधकाम शास्ती रद्द करण्यासंदर्भातील निर्णय पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत होणार आहे. त्यात हा प्रश्न मार्गी लागणार आहे. अनधिकृत बांधकाम नियमितीकरणातही सुटसुटीतपणा आणण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. त्याची लवकरच कार्यवाही होईल, अशी माहिती बापट यांनी दिली.