शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; साडेतीन लाखांचे दागिने केले परत

By admin | Updated: May 20, 2017 05:10 IST

एका प्रामाणिक रिक्षाचालकामुळे महिलेला रिक्षात विसरलेले सुमारे साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने परत मिळाले आहेत. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे परिसरातील

- लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : एका प्रामाणिक रिक्षाचालकामुळे महिलेला रिक्षात विसरलेले सुमारे साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने परत मिळाले आहेत. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले. रिक्षात विसरलेले दागिने परत मिळाल्याबद्दल महिलेने रिक्षाचालकाचे आभार मानले. वसीम शेख (एसबी कॅम्प, देहूरोड) असे रिक्षाचालकाचे नाव आहे.देहूरोड येथून रात्री साडेआठच्या सुमारास वैशाली भेगडे यांनी देहूरोड रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षा पकडली. त्यांच्या हातात चार पिशव्या होत्या. देहूरोड रेल्वे स्थानकावर घाई गडबडीत त्या उतरल्या. त्यांची एक पिशवी रिक्षातच विसरली. त्या पिशवीत सुमारे १० तोळ्यांचे सोन्याचे दागिने होते. रिक्षात दागिन्याची पिशवी विसरल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. त्यांनी रेल्वे स्थानकाबाहेरील सर्व रिक्षाचालकांकडे चौकशी केली. त्यांची गोंधळलेली अवस्था पाहून आजूबाजूचे लोक जमा झाले, त्यांनीही शोधा-शोध सुरू केली. काहींनी त्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात रिक्षाचालक देहूरोड स्थानकावरून दूर अंतर गेला होता. एका प्रवाशाने हात दाखवून त्याची रिक्षा थांबवली. त्या वेळी रिक्षात एका महिलेची पिशवी राहिली असल्याचे त्याच्या लक्षात आले. तेथून तो परत देहूरोड स्थानकावर आला. प्रवाशाला आला सुखद अनुभववैशाली भेगडे या रेल्वे स्थानकाबाहेर रडताना दिसल्या. रिक्षाचालकाने तातडीने तेथे जाऊन त्यांची दागिने असलेली पिशवी त्यांच्या स्वाधिन केली. रिक्षात विसरलेली दागिन्याची पिशवी रिक्षाचालकाने स्वत:हून आणून दिली. हा त्यांच्यासाठी सुखद अनुभव ठरला. त्यांनी रिक्षाचालकाचे मनापासून आभार मानले.