शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

शहरासाठी सरसावले कलाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 05:47 IST

शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवत शहराला सुंदर बनविण्यासाठी लोणावळ्यातील कलाकारांनी (आर्टिस्ट ग्रुप) पुढाकार घेतला  आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या नगर परिषद मालकीच्या,  तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारा उद्बोधक संदेश व चित्र रंगविण्याचे काम कलाकारांची ही टीम करणार आहे.

ठळक मुद्देसुंदर, स्वच्छ लोणावळा भिंतीवरील चित्र, संदेशाद्वारे जनजागृती करणार

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात सहभाग नोंदवत शहराला सुंदर बनविण्यासाठी लोणावळ्यातील कलाकारांनी (आर्टिस्ट ग्रुप) पुढाकार घेतला  आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या नगर परिषद मालकीच्या,  तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारा उद्बोधक संदेश व चित्र रंगविण्याचे काम कलाकारांची ही टीम करणार आहे.स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून शहर स्वच्छ, सुंदर व कचरामुक्त, तसेच निर्मल करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य सभापती पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शहरात स्वच्छतेबाबतची कामे व प्रबोधन मोहीम सुरू आहे. नगर परिषदेचे सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकारी, तसेच लोकप्रतिनिधी, शहरातील विविध सामाजिक संस्था व जागरूक नागरिक, तसेच मान्यवर मंडळींनी यामध्ये पुढाकार घेत झोपडपट्टी ते उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये जाऊन जनजागृती सुरू केली आहे. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, ओला व सुका कचरा कोणता व तो वर्गीकरण कसा करावा, सुक्या कचर्‍यापासून घरच्या घरी खतनिर्मिती, कचरा निर्माण होणार नाही याकरिता काय करावे अशी माहिती देण्याचे काम सर्व स्तरावर सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात, तसेच मुख्य रस्त्याकडेला नगर परिषदेच्या, तसेच खासगी मालमत्ताधारकांच्या अनेक भिंती आहेत. त्या सर्व भिंती रंगवत त्यावर स्वच्छतेचा संदेश देणारे उद्बोधक वाक्य व चित्र रंगविण्यात येणार आहे. शहरातील आर्टिस्ट ग्रुपने यामध्ये पुढाकार घेतला असून, या उपक्रमात सर्व हौशी कलाकारांनी, कला शिक्षकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या कामाकरिता लागणारे रंग व इतर सर्व साहित्य नगर परिषद पुरविणार आहे. हौशी कलावंत व शाळांमधील चित्रकलेचे विद्यार्थी हे देखील यामध्ये सहभाग नोंदवू शकतात. त्यांनी सहभागाकरिता मुख्याधिकारी सचिन पवार, कला शिक्षक राजेंद्र दिवेकर, संजय गोळपकर, सचिन कुटे, संजोग पिसे, सागर तावरे, विशाल केदारी, नितीन तावरे, प्रमोद प्रांचाळ, हनुमंत वाघमारे, चंद्रकांत जोशी, दत्ता थोरात आदीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नवोदित कलाकारांना यामधून आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या रंगकामामुळे शहरात येणारे पर्यटक व नागरिक यांनाही स्वच्छतेचे महत्त्व समजणार आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून रस्त्याच्या कडेला ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो अशा भागातील भिंती रंगवत त्यावर प्रबोधनपर संदेश लिहिण्यात येणार आहेत.