शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार यांच्या हस्ते पै. अर्जुन काटे यांचा पिंपळे सौदागरमध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 12:11 IST

एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी घेण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीत पै. धीरज बोऱ्हाडेने ५७ किलो माती गटात पै. अभिषेक कडूसकरला चितपट करुन विजय मिळविला.

ठळक मुद्दे१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. २० ते २४ डिसेंबरला होणार भूगाव येथेपै. दामुअण्णा काटे, पै. भरत कुंजीर यांचा अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान

रहाटणी : एकसष्टाव्या राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी घेण्यात आली. उद्घाटनाच्या पहिल्या कुस्तीत पै. धीरज बोऱ्हाडेने ५७ किलो माती गटात पै. अभिषेक कडूसकरला चितपट करुन विजय मिळविला. ५७ किलो मॅटवरील उद्घाटनाच्या सामन्यात पै. कुणाल जाधवने पै. शुभम शिंदेला बांगडी डावावर चितपट करुन विजय मिळविला. ९७ किलो गटात मातीवर झालेल्या चित्तवेधक लढतीत पै. आदेश नाणेकरने पै. संकेत धाडगेला ६ विरुद्ध ० गुणांनी पराभूत करुन विजय मिळविला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची ६१ वी राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दि. २० ते दि. २४ डिसेंबर २०१७ ला भूगाव (ता. मुळशी, जि. पुणे) येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने कै. पंढरीनाथ फेंगसे यांचे स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे पाटील क्रीडानगरीत रविवारी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने पिंपळे सौदागर येथील वस्ताद पै. अर्जुन दत्तोबा काटे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पै. दामुअण्णा काटे व पै. भरत कुंजीर यांना नाना काटे सोशल फाउंडेशनच्या वतीने अजित पवार यांच्या हस्ते विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

 यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, संयोजक व नगरसेवक विठ्ठल काटे, संघाचे उपाध्यक्ष काळूराम कवीतके, संतोष माचुत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, सचिव धोंडीबा लांडगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते शंकर काटे, आॅलिम्पिक वीर मारुती आडकर, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, भारत केसरी विजय गावडे, हिंद केसरी अमोल बराटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, कैलास थोपटे, हरीभाऊ तिकोणे, सुनिल कुंजीर आदींसह कुस्ती शौकीन उपस्थित होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार