शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांच्या वीजविषयक मागण्यांना मंजुरी द्या; शासनाने अडचणी सोडवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 18:54 IST

राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी हे सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक

ठळक मुद्देऔद्योगिक ग्राहकांना सवलती दिल्यास त्यांना उभारी मिळेल व पूर्वपदावर येण्यासाठी बळ मिळेल

पिंपरी : कोरोना महामारीमुळे राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व लघु दाब व उच्च दाब उद्योग २२ मार्च २०२० पासून बंद आहेत. आता राज्य शासनाने उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तरीही कामगार, कच्चा माल, विक्री व वाहतूक व्यवस्था यासह इतर अडचणींमुळे ४ ते ५ महिने लघुदाब व उच्चदाब उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू होणे अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर या सर्व औद्योगिक ग्राहकांच्या वीज विषयक मागण्यांना मंजुरी द्यावी, अशी मागणी होत आहे. पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन दिले आहे. लॉकडाऊनमुळे उद्योग बंद असल्याने वीज वापर झाला नाही. त्यामुळे स्थिर व मागणी आकार ६ महिन्यांसाठी रद्द करावा. वीज बिलाची थकबाकी भरण्यास ६ महिने मुदत मिळावी. तसेच ही थकबाकी भरण्यासाठी जुलै ते डिसेंबर असे ६ मासिक हप्ते बिना व्याज विना दंड पद्धतीने मंजूर करण्यात यावेत. पावर फॅक्टर पेनल्टीमुळे उद्योगांना दीड पट बिल आले. त्यामुळे ही पेनल्टी ६ महिन्यांसाठी रद्द करावी. उच्च दाब औद्योगिक ग्राहकांवरील केव्हीएएच बिलिंग आकारणी पद्धत तात्पुरती एक वर्षाकरता रद्द करावी. राज्याची अर्थव्यवस्था रुळावर येण्यासाठी हे सर्व उद्योग पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी पद्धतीची आकारणी तात्पुरती १ वर्षांसाठी रद्द करण्यात यावी व एक वर्षांसाठी पूर्वीच्याच पद्धतीनुसार वीज बिलाची आकारणी करण्यात यावी. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लघुदाब व उच्चदाब औद्योगिक ग्राहकांना सवलती दिल्यास त्यांना उभारी मिळेल व पूर्व पातळीवर येण्यासाठी बळ मिळेल, असे निवेदनात नमूद केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडmahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकारMIDCएमआयडीसी