शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत १५ कोटी २३ लाखांच्या विकासकामांना मंजुरी; सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास आता १ हजार दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 20:46 IST

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे पडणार महागात

ठळक मुद्देपवना जलवाहिनीसाठी सल्लागार नियुक्त करण्यास मंजुरी

पिंपरी : शहरामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध करणेकामी सार्वजनिक परिसरामध्ये थुंकणाऱ्या व्यक्तींविरुध्द रक्कम रुपये १ हजार इतका दंड आकारण्यात येणार आहे. तसेच पवना जलवाहिनीसाठी सल्लागार नियुक्तीच्या विषयासह पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकासकामांसाठी येणाऱ्या सुमारे १५ कोटी २३ लाख रूपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरीत स्थायी समिती सभागृहात बुधवारी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. विषय पत्रिकेवर ३० विषय होते. त्यात पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरातील  सेक्टर क्रमांक २३ जलशुध्दीकरण केंद्र निगडीपर्यंत पाणी आणण्यासाठी थेट पाईपलाईन टाकणेच्या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्तीचा विषय होता. हा विषय प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला होता. त्यामुळे सत्ताधारी भाजपा त्यास मंजूरी देणार की नाही? याबाबत उत्सुकता होती. मात्र, सत्ताधाऱ्यांनी पवना जलवाहिनीसाठी सल्लागार नियुक्तीच्या विषयास मान्यता देण्यात आली.

चिंचवड येथील मंगलमुर्ती वाडा, चाफेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी मंदिर पासूनचे थेरगाव बोटक्लब पर्यंतचा परिसर सुशोभित करण्याच्या सुमारे ९ कोटी १ लाख रुपयांच्या खर्चास, मलनि:सारण नलिका मॅनहोल चेंबर्सची सफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठीच्या सुमारे १ कोटी २९ लाख रुपयांच्या खर्चास, सुरक्षा विभागामार्फत ठेकेदारी पध्दतीने सुरक्षा व्यवस्था या उपक्रमान्वये सुरक्षा व्यवस्था करण्यासाठीच्या सुमारे ५५ लाख ७ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महापालिकेच्या विविध विभागास आवश्यक छपाई साहित्य खरेदी करण्यासाठीच्या सुमारे १ कोटी २२ लाख २५ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली..........

स्वच्छतागृहांची स्वच्छतामहापालिका प्रभाग क्रमांक २०, ३०, ३१ व ३२ प्रभागासाठी १३२८ सार्वजनिक स्वच्छतागृहे व मुता-यांची यांत्रिकी पध्दतीने व मनुष्यबळाव्दारे दैनंदिन साफसफाई, देखभाल व किळकोर दुरुस्ती करणेकामी येणाऱ्या सुुमारे ३० लाख ६१ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. महानगरपालिका ह क्षेत्रीय कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी काविड १९ आपत्ती व्यसस्थापनासाठी प्रकाश व्यवस्था, जनित्रसंच, सी.सी.टीव्ही व अन्य विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे २९ लाख ३ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली...........

झोपडपट्टी पुर्नवर्सन इमारत दुरूस्तीशहर झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत मिलिंदनगर येथील प्रकल्पामधील इमारतीच्या दुरुस्तीची कामे करणेकामी येणाऱ्या सुमारे २ कोटी २७ लाख ३८ हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरMayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्या