शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ, सुंदर शहरासाठी पुढे या, महापालिकेकडून आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 04:38 IST

शहराची स्वच्छता राखणे हे शहरातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा.

पिंपरी : शहराची स्वच्छता राखणे हे शहरातील प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून, विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. केंद्र शासनाने विकसीत केलेल्या स्वच्छता अ‍ॅपचा वापर करून त्याद्वारे शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सह आयुक्त तथा स्वच्छ शहर संचालक दिलीप गावडे यांनी केले.महापालिकेच्या वतीने व राजमाता जिजाऊ महाविद्यालय, लांडेवाडी यांच्या सहकार्याने स्वच्छ महाराष्ट्र, स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविलेल्या स्वच्छता अभियान रॅलीतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते बोलत होते.या वेळी नगरसदस्य विक्रांत लांडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम भोंग, उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, प्रा. श्रेया दाणे, सविता वीर, जयश्री आरमणी, मारुती शिंदे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.रॅलीची सुरुवात राजमाता जिजाऊ महाविद्यालयापासून झाली. या रॅलीचा मार्ग लांडेवाडी चौक, सावित्रीबाई फुले शाळा, गव्हाणे वस्ती परिसर व पुन्हा राजमाता जिजाऊ महाविद्यालय असा होता. या रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. रॅलीमध्ये स्वच्छ पिंपरी-चिंचवड शहराबाबत घोषणा देण्यात आल्या. ही रॅली पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.काही जण विद्यार्थी देत असलेल्या घोषणांना प्रतिसादही देत होते.महापालिकेचे सहायक आयुक्त बोदडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वच्छताविषयक अ‍ॅपची सविस्तर माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी केले. आभार प्रा. दीपक पावडे यांनी मानले.मंगळवारी सांगवी येथील बाबूराव घोलप महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी महापालिकेच्या सहकार्याने परिसरात रॅली काढत स्वच्छताविषयक जनजागृती केली. ह क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे यांनी मार्गदर्शन केले. प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या माधवी राजापुरे, सीमा चौगुले, सह आयुक्त तथा स्वच्छ शहर संचालक दिलीप गावडे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब झावरे, उपप्राचार्य डॉ. लतीश निकम, डॉ. शिवाजी ढगे, प्रा. डॉ. नरसिंग गिरी, प्रा़ स्वप्निल जगताप, ज्ञानेश्वर जांभूळकर, विठ्ठल नाईकवडे, विजय घारे, प्रवीण येवले, विद्या पठारे, अमृता इनामदार, कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे उपस्थित होते.रॅलीची सुरुवात घोलप महाविद्यालयापासून झाली़ फेमस चौक, शिवाजी चौक, कृष्णा चौक व साई चौकापासून पुन्हा महाविद्यालय असा रॅलीचा मार्ग होता. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी ‘अब ना रहेगी हगणदरी, हमने ली है जिम्मेदारी’, ‘स्वच्छतेची कास धरू, पिंपरी-चिंचवड स्वच्छ करू’, ‘स्वच्छ भारत आमचा नारा, रोगराईला नाही थारा’ अशा स्वच्छतेबाबतच्या जनजागृतीपर घोषणा दिल्या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड