शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणी येथे अतिक्रमण विरोधी कारवाई पथकावर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:02 IST

रहाटणी नखातेवस्ती येथील विकास अनधिकृत बांधकाम धारकांना कारवाई करण्याअगोदर नोटीस न देता अतिक्रमण विभागाचे पथक आज सकाळी कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देरहाटणी येथे महापालिकेच्या विकास आराखड्यातील बारा मीटर डीपी रस्ता प्रस्तावितरहिवाशांचा रस्त्याला विरोध व रस्ता नऊ मीटर करावा, अशी मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने काळेवाडी, रहाटणी नखातेवस्ती येथील कारवाईला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. विकास आराखडयातील रस्त्यातील अनधिकृत बांधकामांवर पालिकेकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. यावेळी तेथील स्थानिक रहिवाशांनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर दगडफेक केली. तसेच काहींनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे या परिसरात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने रहाटणी येथे महापालिकेच्या विकास आराखड्यातील बारा मीटर डीपी रस्ता प्रस्तावित आहे. रहाटणीतील नखाते चौक ते कोकणे चौक याला जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यात तीस वर्षांपासून पंन्नासहून अधिक घरे आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांचा या रस्त्याला विरोध आहे. त्यांनी हा रस्ता नऊ मीटर करावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली होती. रहाटणी नखातेवस्ती येथील विकास अनधिकृत बांधकाम धारकांना कारवाई करण्याअगोदर नोटीस न देता अतिक्रमण विभागाचे पथक आज सकाळी कारवाईला गेले. नोटीस न देता कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी करत गोंधळ घातला. जेसीबीवर दगडफेक केली. 

टॅग्स :rahatniरहाटणीEnchroachmentअतिक्रमण