शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवपुत्र संभाजी महानाट्यातून आत्ताच्या राजकीय परिस्थितीचेही उत्तर; खासदार अमोल कोल्हे यांचे भाष्य

By विश्वास मोरे | Updated: May 4, 2023 20:55 IST

जगदंब क्रियेशनच्या वतीने शिवपूत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग ११ मे पासून पिंपरी-चिंचवड शहरातील एच ए मैदानावर होणार आहेत.

पिंपरी : राज्यात एक महानाट्य सुरू असताना इकडे एक महानाट्य सुरू होतेय, ते बघायला या , प्रत्येकवेळी भाष्य करायची गरज नाही. शिवपुत्र संभाजी महानाट्य बघा.  त्यात आत्ताच्या राजकीय परिस्थितीचही उत्तर मिळेल, असे मत प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.

जगदंब क्रियेशनच्या वतीने शिवपूत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग ११ मे पासून पिंपरी-चिंचवड शहरातील एच ए मैदानावर होणार आहेत. त्याअनुषंगाने डॉ. कोल्हे यांनी माध्यमांशी संवाद साधला. महानाट्याचे प्रयोग, भाजपाशी सलगीची चर्चा, राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा राजीनामा याविषयी माध्यमांनी प्रश्न विचारल्यानंतर १७ मेला याबाबत भूमिका मांडण्यात आली.

डॉ कोल्हे म्हणाले, ‘‘ स्वराज्याच्या दुसºया छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी नक्की हे महानाट्य पाहावे.  चित्तथरारक घोडेस्वारी, १२० फुटी रंगमंच ५५ फुटी तीन मजली किल्ल्याची प्रतिकृती, मराठे मोगल रणसंग्राम, २२ फुटी जहाजावरून जंजिर मोहीम, थेट प्रेक्षकांमधून जाणारी गनिमिकाव्याची बुºहाणपूर मोहीम, संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापरला आहे. तसेच शहरातील स्थानिक कलाकारांना देखील या महानाट्यात काम करण्याची संधी दिली आहे. तब्बल नऊ वर्षांनी हे महानाट्य पुन्हा भेटीला आले आहे.’’  

शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, याबाबत विचारले असता, कोल्हे म्हणाले, ‘‘नाट्यप्रयोग आणि आजारी असल्याने मी बाहेर आहे. शरद पवार सर्व बाजूने विचार करूनच निर्णय घेतात बाकी निर्णय समिती ठरवेल. त्यांनी घेतलेला निर्णय दूरगामी ठरणारा आहे. आता दिल की सुने या दिमागकी सुने, अशी अवस्था झाली आहे. इतर राजकीय परिस्थितीवर सद्या भाष्य करणं उचित ठरणार नाही. संभाजी महाराजांवरील महानाट्य प्रत्येक राजकारण्यांनी बघायला हवं. त्यामध्ये सर्वच उत्तरे मिळतात.’’काही महिन्यांपूर्वीच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबरचे छायाचित्र सोशल मिडीयावर गाजले होते. याविषयी विचारले असता, डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘शिवप्रताप गरूडझेपच्या पोस्टरच्या अनुषंगाने भेट झाली होती. त्यावरून विविध राजकीय वावड्या उठविल्या जात आहेत. त्यानंतर माझी संसदेत झालेली भाषणे सर्वांनी ऐकावीत, पहावीत. एखाद्या भेटीवरून कयास लावणे चुकीचे आहे.’’नेता आणि अभिनेता भूमिकांना न्याय देता येतो का? यावर कोल्हे म्हणाले, ‘‘दोन्ही भूमिका आवडीच्या आहेत. दोन्ही भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न असतो. तत्व आणि निष्ठा महत्वाची असते.  मतदार संघातील जनतेशी संवाद ठेऊन कलचे कामही निष्ठेने करीत आहे. ’’

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हे