शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ कार्यालयाचा बुधवारी वर्धापनदिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 02:31 IST

महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या ‘लोकमत’ची पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दमदार वाटचाल सुरू आहे

पिंपरी : महाराष्ट्राचा मानबिंदू असणाऱ्या ‘लोकमत’ची पिंपरी-चिंचवड शहर परिसरात दमदार वाटचाल सुरू आहे. ‘लोकमत’ पिंपरी-चिंचवड आवृत्तीचा १८वा वर्धापन दिन सोहळा बुधवारी (दि. २८) साजरा होत आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सायंकाळी पाच ते नऊ या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे.समाजहितासाठी आक्रमकता आणि विधायक दृष्टिकोनामुळे ‘लोकमत’ पुणे शहर व जिल्ह्यातील जनतेचा आवाज बनला आहे. वाचकांच्या भरभक्कम, उदंड पाठबळावरच्या या अग्रेसर प्रवासात ऋणानुबंधाच्या गाठी आणखी घट्ट करणारा सोहळा म्हणजेच पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन होय.सर्वच स्तरांतील घटना, घडामोडींची, समाजघटकांची योग्यप्रकारे दखल घेणारा समाजमनाचा आरसा मानला जाणाºया लोकमतने वाचकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. लोकमत केवळ वृत्तपत्र नसून, विधायक चळवळ बनले आहे. समाजपरिवर्तन आणि विकासप्रक्रियेत लोकमतचे योगदान महत्त्वपूर्ण ठरू लागले आहे.पिंपरी-चिंचवडनगरीतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, उद्योग, प्र्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांबरोबरच ‘लोकमत’च्या वाचकांचा या निमित्त स्नेहमेळावा होणार आहे. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणाºया सोहळ्यात शहर व मावळच्या विकासावर आधारित ‘ब्रॅण्ड पिंपरी-चिंचवड’ या वर्धापन दिन विशेष पुरवणीचे प्रकाशन करण्यात येणार आहे.वाचक, विक्रेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीसोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन लोकमत परिवारातर्फे केले आहे.