शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जलपर्णीमुक्त अभियानात सहभागी होणार अंजली भागवत; रावेत येथे पवनामाई स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 11:40 IST

रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्देरविवारी सकाळी रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान अभियानाला सुरुवातीपासून विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

रावेत : रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णी मुक्त स्वच्छ पवनामाई' हे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाला सुमारे तीन महिने पूर्ण होत आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे राबविण्यात येणार आहे. या जलपर्णी मोहिमेत खेलरत्न व अर्जुन पुरस्कारविजेत्या व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्वच्छता दूत अंजली भागवत सहभागी होणार आहेत.अंजली भागवत जलपर्णी मोहिमेत सहभागी होत असल्याने मोहिमेतील सर्वांना काम करण्यासाठी उत्साह आला आहे. तसेच विविध संघटना अभियानामध्ये जोडल्या जात आहेत. रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे पदाधिकारी व सदस्य मागील तीन महिन्यांपासून पवनामाईला जलपर्णीमुक्त करण्यासाठी अविरत काम करीत आहेत. पवना नदीच्या उगमापासून ते पवना नदीच्या संगमापर्यंत ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये शेकडो ट्रक जलपर्णी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली आहे. याचाच पुढील टप्पा ४ फेब्रुवारी २०१८ ला पवनामाई जलपर्णीमुक्त अभियान रावेत बंधारा येथे सकाळी ८ वाजता राबविण्यात येणार आहे. अभियानाला सुरुवातीपासून विविध सामाजिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रविवारी सकाळी आठ वाजता पवनामाई जलपर्णीमुक्त अभियानाला सुरुवात होणार आहे. असाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन रोटरी क्लब आॅफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांनी केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडravetरावेत