शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

...अन् तेजस्विनी झाली कलावंत

By admin | Updated: March 8, 2017 05:00 IST

पदवीचे शिक्षण घेताना अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. पण त्याचे दु:ख करत न बसता अपुऱ्या साधनांच्या जोरावर तिने अभ्यास केला आणि पदवीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण

पिंपरी : पदवीचे शिक्षण घेताना अचानक दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. पण त्याचे दु:ख करत न बसता अपुऱ्या साधनांच्या जोरावर तिने अभ्यास केला आणि पदवीपर्यंतचे शिक्षण तिने पूर्ण केले आणि एवढ्यापर्यंतच न थांबता तिने पदव्युत्तर पदवीही प्रथम वर्गाने ग्रहण केली आणि आज ती नाट्यक्षेत्रात एक सक्षम कलावंत म्हणून अभिनय करीत आहे. ही कथा आहे तळवडेमधील एका सावित्रीच्या लेकीची... तेजस्विनी भालेकरची. रुपीनगर येथे राहणाऱ्या तेजस्विनीने पदवीपर्यंतचे शिक्षण निगडी येथील डॉ. अरविंद तेलंग महाविद्यालयात घेतले. वाणिज्य शाखेच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असतानाच तिची दृष्टी अचानक गेली. तरुण वयात डोळ्यांसमोरून जग नाहीसे झाले. मात्र या संकटापुढे गुडघे न टेकता, अपुरी साधने आणि मित्र-मैत्रिणींच्या मदतीने तिने पदवी, पदव्युत्तर शिक्षण प्रथम वर्गाने पूर्ण केले. या दरम्यान तिने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अंध विद्यार्थी कल्याण मंडळामध्ये प्रवेश घेतला. तेथील शिक्षकांच्या मदतीने तिने ब्रेल लिपी आत्मसात केली. त्या प्रशिक्षणाच्या जोरावर ती संगणक हाताळू लागली. फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारख्या माध्यमांचा ती लीलया वापर करू लागली. एम. कॉम. मध्ये मिळालेल्या गुणांच्या जोरावर तिने केंद्र सरकारची राजीव गांधी अधिछात्रवृत्ती मिळविली. या फेलोशिपच्या मदतीने पीएच. डी. करण्याची तिची इच्छा आहे. (प्रतिनिधी) केवळ दृष्टी नाही म्हणून काळजीपोटी मुलींचे शिक्षण थांबवून घरात बसविणे, हे आजच्या युगात योग्य नव्हे. रोज नवनवीन तंत्रज्ञान येत असल्याने या तंत्रज्ञानाच्या जोरावर मुली अशा मात करीत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलींना शिकण्यास आणि मनसोक्त जगण्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. कारण त्यांनाही या स्पर्धेत यायचे आहे.आई-वडिलांकडून पाठबळ अन् प्रेरणातेजस्विनीचे विशेष म्हणजे ती केवळ अभ्यासातच हुशार नाही, तर तिने अभिनयातही प्रावीण्य मिळविले आहे. कॉलेज जीवनात पथनाट्य सादर करताना लागलेली अभिनयाची गोडी कामी आली आणि आता तेजस्विनी व्यावसायिक नाटकात अभिनय करू लागली. ‘अपूर्व मेघदूत’ या व्यावसायिक नाटकाचे सध्या राज्यभर प्रयोग सुरू आहेत. या नाटकात दामिनीची भूमिका ती साकारत आहे. अंध आहे म्हणून केवळ घरातच बसवून न ठेवता तेजस्विनीला पाठबळ देणारे तिचे आई-वडील इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. डोळस माणसालाही लाजवेल असा ज्ञान आणि अभिनयाच्या क्षेत्रात तेजस्विनीचा मुक्त वावर सुरू आहे.