शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

... अन् भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचा संदेश, कलाकारांनी चित्रांतून दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 03:18 IST

शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंतीच नागरिकांना व पर्यटकांना स्वच्छतेबाबत संदेश देत आहेत.

लोणावळा : शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंतीच नागरिकांना व पर्यटकांना स्वच्छतेबाबत संदेश देत आहेत.लोणावळा शहर १०० टक्के स्वच्छ व कचरामुक्त करणे हे प्रशासनाकरिता आव्हानात्मक आहे. मात्र, हे शिवधनुष्य पेलत शहराला केवळ नामांकन मिळावे म्हणून नाही, तर शहर खºया अर्थाने स्वच्छ व सुंदर बनावे याकरिता नगर परिषदेकडून दैनंदिन स्वच्छतेच्या कामासोबत काही नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमांना नगर परिषद कर्मचारी व अधिकारी, नागरिक, कलाकार, संस्था, तसेच शाळांचे शिक्षक व विद्यार्थी या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम ही लोणावळेकरांची मोहीम होऊन बसली आहे.नागरिकांचा प्रतिसाद व सकारात्मकता ही सर्वेक्षणांच्या मानांकनापेक्षा मोठी व कायमस्वरूपाची असल्याची भावना नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी व्यक्त केली आहे.लोणावळा रेल्वे स्थानकावर रंगविलेल्या भिंतींच्या धर्तीवर शहरातील मुख्य भिंती रंगविल्यास त्या उद्बोधक ठरतील अशी कल्पना उदयास आली. मात्र, ती प्रत्यक्षात उतरविण्याकरिता मोठा खर्च अपेक्षित असल्याने नव्याने निर्माण झालेले संकट सोडविण्याचे महत्त्वाचे कार्य शहरातील चित्रकार मंडळींनी केले. कसलाही मोबदला न घेता दर शनिवार व रविवार सेवा तत्त्वावर शहराकरिता वेळ देण्याचे लहान-मोठ्या सर्व कलाकार मंडळींनी मान्य केले.भिंती रंगविण्याच्या मोहिमेकरिता लागणारा रंग व इतर साहित्य देखील काही दानशूर मंडळींनी उपलब्ध करून दिल्याने मागील दीड महिन्यापासून नगर परिषदेचा एक रुपयाही यासाठी खर्च झालेला नाही. शहरातील नांगरगाव, वलवण, खंडाळा सनसेट व इतर भागात देखील यापुढील काळात भिंती रंगविण्याचे काम करीत जनजागृती कायम ठेवण्याचा मानस कलाकार मंडळींनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :paintingचित्रकलाlonavalaलोणावळा