शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Anant Chaturdashi 2022| 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर...' पिंपरी- चिंचवडमध्ये घरगुती गणरायाचे विसर्जन 

By विश्वास मोरे | Updated: September 9, 2022 14:27 IST

लाडक्या गणरायाला गणेश भक्तांकडून निरोप

पिंपरी: अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी सकाळी पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या जल्लोषात, उत्साह पूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला. ''गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..., अशा घोषणा देत ''पुढच्या वर्षी लवकर...'' या अशी आर्जव करीत लाडक्या गणरायाला गणेश भक्तांनी निरोप दिला. 

पिंपरी- चिंचवड शहरांमध्ये सकाळपासूनच घरगुती गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त विसर्जन घाटांवर येत होते. चिंचवड परिसरातील मोरया गोसावी घाट,  थेरगाव बिर्ला हॉस्पिटल पूल घाट, रावेत घाट येथे गणरायाचे विसर्जन करण्यात आले. पावसाची उघडीप पवना घाटावर महापालिकेच्या वतीने आरोग्य सेवक, वैद्यकीय सेवक आणि अग्निशमन दलाचे पथक  तैनात करण्यात आली होती.  तसेच कृत्रिम हौदही तयार करण्यात आला होता. नदीत गणरायाचे विसर्जन करण्याऐवजी हौदात विसर्जन करावे, असे आवाहन सामाजिक संस्था च्या वतीने करण्यात आले होते.  या आव्हानाला सकाळच्या टप्प्यामध्ये प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. आज सकाळपासूनच पावसाने उघडीत दिल्याने गणेश भक्तांचा उत्साह अपूर्व असल्याचे दिसून आले. चिंचवडला स्वागत कक्षपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील मिरवणुकीसाठी चाफेकर चौकामध्ये स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे. तसेच पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. विसर्जन मार्गावर थेरगाव घाटाजवळ पोलिसांच्या वतीने कक्ष स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले होते. दुपारी दीड पर्यंत पवना नदी घाटावर घरगुती गणरायाचे विसर्जन केले जात होते. गणेशभक्त रिक्षा, टेम्पो स्वतःच्या कारमधून गणरायाला घेऊन नदी घाटावर येत होते.  त्या ठिकाणी मनोभावे आरती म्हणून विसर्जन केले जात होते.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGanesh Mahotsavगणेशोत्सव