शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Anant Chaturdashi 2022| घरगुती बाप्पांना भक्तीपूर्ण निरोप! पारंपरिक वाद्यांचा गजरात मिरवणुका

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: September 9, 2022 18:06 IST

पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती....

पिंपरी : ‘निरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी’ अशी बाप्पाकडे भावना व्यक्त करत शुक्रवारी घरगुती गणरायाला भक्तीपूर्ण निरोप दिला. पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणी कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात मूर्ती विसर्जन करून शहरवासीयांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा यंदाही कायम ठेवली.

विघ्नहर्ता गणेशाची यंदा घरोघरी मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली. दहा दिवस रंगणाऱ्या भक्तीच्या या मेळ्यामुळे सर्वत्र आनंदी वातावरण पसरले आहे. गणरायाची मनोभावे पूजाकरून भक्तांनी घरगुती बाप्पांना निरोप दिला.

महापालिकेकडून कृत्रिम तळ्यांची उभारणी करण्यात आली होती. या तळ्यात सकाळी सात वाजल्यापासून नागरिक मूर्ती विसर्जनासाठी येत होते. सायंकाळी पाच नंतर शहरातील काही सार्वजनिक मंडळाकडून पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. गणेश भक्तांकडून ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करण्यात आला. या जयघोषाने परिसर दुमदुमून गेली. मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी सातारकरांनी राजपथावर गर्दी केली होती.

घाटावर संरक्षित जाळ्या, मूर्ती दान करण्याचे आवाहनपवना नदीत पाणी जास्त असल्याने जाधव घाट तसेच चिंचवडमधील विसर्जन घाटांवर लोखंडी संरक्षित जाळ्या लावण्यात आल्या होत्या. वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये याचे चोख नियोजन करण्यात आले होते. पोलिसांनी केलेल्या उत्तम नियोजनामुळे मिरवणूक सोहळ्यात कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. घाटांवर विविध संस्थांकडून मूर्तीदानचे आवाहनही करण्यात येत असून त्यास गणेशभक्तांकडून प्रतिसादही उत्तम मिळत आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सवganpatiगणपती