शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमृतांजन पॉइंट मद्यपींचा अड्डा

By admin | Updated: May 9, 2017 03:40 IST

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील पर्यटकांचे आकर्षणस्थळ असलेला अमृतांजन पॉइंट हा दारुड्यांचा अड्डा बनला असून,

लोकमत न्यूज नेटवर्कलोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील पर्यटकांचे आकर्षणस्थळ असलेला अमृतांजन पॉइंट हा दारुड्यांचा अड्डा बनला असून, परिसरात सर्वत्र दारूच्या रिकाम्या बाटल्या व फुटलेल्या बाटल्यांच्या काचांचा खच पडला आहे. त्यामुळे या ठिकाणी उभे राहणेही धोक्याचे बनू लागले आहे. विशेष म्हणजे ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला अमृतांजन पूल हा हेरिटेज वास्तू म्हणून घोषित झाला आहे.मुंबई व कोकण परिसरातून जीवघेण्या उष्म्याचा सामना करून घाट चढत लोणावळ्याच्या दिशेने येताना याच ठिकाणी वातावरणात बदल होतो व थंड हवेची झुळूक जिवाला सुखावते. अशा या अमृतांजन पॉइंटवर मोठ्या संख्येने पर्यटक परिवारासमवेत थांबतात. या ठिकाणाहून सह्याद्रीचा उंच सुळका असलेला नागफणी डोंगराचा (ड्युक्स नोज) परिसर, हिरवाईने नटलेली दरी, बोगद्यातून लपंडाव खेळत जाणारी रेल्वे गाडी, खोपोली शहराचा परिसर, खंडाळा घाटातील नागमोडी वळणे पाहायला मिळत असल्याने या विहंगम दृश्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. मात्र, मागील काही दिवसांपासून या ठिकाणाला दारुड्यांची नजर लागली आहे. दुपारच्या वेळी झाडाझुडपाचा आसरा घेत, तर सायंकाळनंतर जागा दिसेल त्या ठिकाणी बसून येथे दारूच्या पार्ट्या झडू लागल्या आहेत. दारू पिऊन झाल्यानंतर ही मंडळी बाटल्या तेथेच फोडत असल्याने परिसरात सर्वत्र काचाचा खच पडला आहे. असे असताना या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेकडून काहीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे या आकर्षक स्थळावर दारूड्यांचा वावर वाढतच आहे.