शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीतील महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव कटिबद्ध ; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 21:17 IST

पिंपरीत सुराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र अतोनात प्रयत्न करणार

ठळक मुद्देमहापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णप्रकाश यांच्यासमवेत महिला नगरसदस्यांची बैठक

पिंपरी :  महिलांसह सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित वाटावे असे सुराज्य निर्माण करण्यासाठी आपण अतोनात अहोरात्र प्रयत्न करण्यास कटिबध्द असून पोलिसांच्या अवतीभोवती असणाऱ्या दलाल आणि तडजोड करणाऱ्यांना दूर ठेवणार आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे  पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी केले. 

पिंपरी चिंचवड शहरातील महिला सुरक्षा बाबींविषयी  चर्चा करण्यासाठी  चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली शहर पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या समवेत आज महिला नगरसदस्यांची बैठक झाली. 

या बैठकीस पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, नगरसदस्या सिमा सावळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे मंचावर उपस्थित होते. 

.......

सदस्यांनी केल्या मागण्या

 

शहरातील अवैध धंदे, दारु, मटका, जुगार अड्डे गुन्हेगारीचे केंद्र असून त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील उद्भवत असल्याने अशा अवैध बाबींवर कारवाई करावी, शहरातील काही  उद्यानात होणाऱ्या अश्लील प्रकारास आळा घालण्यात यावा, शाळा महाविद्यालय परिसरात मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण विचारात घेता त्याठिकाणी पोलिसांचे भरारी पथक नियुक्त करावे, रात्रीची गस्त वाढवावी. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, औद्योगिक क्षेत्रातील कामगारांची पोलीस दप्तरी नोंद असावी आदी सूचना नगर सदस्यांनी केल्या.

............

 पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, बैठकीतील सुचना तथा तक्रारींचे स्वरुप पाहता या समस्या केवळ गुन्हेगारीशी संबधित नसून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा बाबींशी निगडीत आहे. तसेच पोलीस आणि जनतेच्या मानसिकतेशीही याचा संबंध येतो. 

पोलीस दलातील ९० टक्के लोक प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावतात. मात्र उर्वरीत १० टक्के लोकांमुळे पोलीस दलाची प्रतिम मलिन होते. म्हणून नियमबाहय काम करणा-या पोलीसांवर नियमाधिन कारवाई करण्यात येईल. तसेच पोलीसांच्या अवतीभोवती असणाऱ्या दलाल आणि तडजोड करणाऱ्यांना दूर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे असून नागरिकांनी न घाबरता तक्रार देण्यास पुढे आले पाहिजे.

शाळा, कॉलेज परिसरात पोलीसांचे पथक नेमले जाईल. सराईत गुन्हेगारांवर तडीपारी सारखी कारवाईदेखील केली जाईल. गैरकायदेशीर कृत्याला आळा घातल्यास आपण सभ्य समाज निर्माण करु शकू. मात्र कोणीही कायदा हातात घेवू नये. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रभूत समजून पोलिसांनी आपले कर्तव्य बजवावे.  

नियमांची अंमलबजावणी करताना पोलीसांच्या कामात कोणीही हस्तक्षेप करु नये. पोलीसांची संख्या कमी असली तरी नागरिकांच्या सहकार्य आणि सहभागातून ही उणीव भरुन निघेल.'

  

 .

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसcommissionerआयुक्तWomenमहिलाMayorमहापौर