शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रभागामुळे युती, आघाडीची शक्यता

By admin | Updated: May 29, 2016 03:46 IST

महापालिका निवडणुकीसाठी चार वॉर्डांचा प्रभाग होणार असून, त्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातीलही राजकीय समीकरणे बदलणार आहे. चार वॉर्डांच्या

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी चार वॉर्डांचा प्रभाग होणार असून, त्याबाबतचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातीलही राजकीय समीकरणे बदलणार आहे. चार वॉर्डांच्या प्रभागामुळे व्यक्तीऐवजी पक्षाला महत्त्व दिले जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे महापालिकेत सत्तेत येण्यासाठी मागील निवडणुकीत जरी स्वतंत्र लढले असले, तरी काँगे्रस आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रस यांच्यात आघाडी, तर सध्या शिवसेना-भाजपा यांच्यात खटके उडत असले, तरी त्यांच्यात युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड शहरातही राजकीय पक्षांची तयारी सुरू आहे. त्यातच चार सदस्यांची प्रभाग पद्धती जाहीर झाल्याने तयारीला वेग आला आहे. २०१२च्या निवडणुकीत काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस निवडणुकीत स्वतंत्र लढले. १२८ पैकी राष्ट्रवादीने ८२ जागांवर विजय संपादन करीत एकहाती सत्ता स्थापन केली. त्यांना इतर पक्षांची गरज भासली नाही. तर काँगे्रस अवघ्या १४ जागांवरच मजल मारू शकली. राष्ट्रवादीने मागील निवडणूक स्वतंत्र लढली असली, तरी सध्याची परिस्थिती वेगळी आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपा, सेनेची सत्ता आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही राजकीय गणिते बदलू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेदेखील नियोजन सुरू केले आहे. मागील वेळी स्वतंत्र लढले असले, तरी यंदा मित्रपक्षाला सोबत घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी राष्ट्रवादीला शह देऊन महापालिकेत सत्तेत येण्यासाठी दोन्ही पक्षांना मोठी ताकत लावावी लागणार आहे. यामुळे मागील निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही दोन्ही पक्षांत युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)शिवसेना-भाजपात खटकेमागील निवडणुकीत शिवसेना-भाजपाची युती असतानाही दोन्हींच्या वाट्याला फारशा जागा आल्या नाहीत. शिवसेनेला १४, तर भाजपाला अवघ्या तीन जागा मिळाल्या. त्यामुळे यंदा सत्तेत येण्यासाठी हवी असणारी ‘मॅजिक फिगर’ गाठता यावी, यासाठी हे दोन्ही पक्ष तयारीत आहेत. मात्र, सध्या दोन्ही पक्षांत वेगवेगळ्या कारणांवरून खटके उडत आहेत. महापालिकेतील सध्याचे पक्षीय बलाबलराष्ट्रवादी काँगे्रस८२शिवसेना१५काँगे्रस१३मनसे०४भाजपा०३आरपीआय०१अपक्ष आघाडी१०एकूण१२८