शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आकुर्डी-चिंचवडगावमधील कारवाईचा देखावाच; वाहतुकीची परिस्थिती ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:16 IST

आकुर्डी-चिंचवडगाव रस्त्यावर मनमानी पद्धतीने पार्क केलेल्या गाड्यांवर वाहतूक शाखेने काल (मंगळवार, दि. १२) कारवाईचा बडगा उगारला. मात्र आज येथील परिस्थिती 'जैसे थे' असल्याने वाहतूक शाखेची कारवाई म्हणजे फक्त दिखावाच असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.

ठळक मुद्देअनेक महिन्यांपासून या भागात मुख्य रस्त्यावर उभी केली जात आहेत व्यावसायिक वाहनेमनमानी पद्धतीने व्यावसायिक वाहने उभी केली जात असल्याने अपघाताच्या घटना नियमित

चिंचवड : आकुर्डी-चिंचवडगाव रस्त्यावर जयगणेश व्हिजन कॉम्प्लेक्स समोर मनमानी पद्धतीने पार्क केलेल्या गाड्यांवर वाहतूक शाखेने काल (मंगळवार, दि. १२) कारवाईचा बडगा उगारला. मात्र आज येथील परिस्थिती 'जैसे थे' असल्याने वाहतूक शाखेची कारवाई म्हणजे फक्त दिखावाच असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.निगडी वाहतूक शाखेच्या वतीने रस्त्यात अडथळा करणाऱ्या पंधरा गाड्यांवर कारवाई केली. अनेक महिन्यांपासून या भागात मुख्य रस्त्यावर व्यावसायिक वाहने उभी केली जात आहेत. दुतर्फा रस्त्यावर अनेक व्यावसायिक वाहने पार्क करण्यात येत असल्याने वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. या बाबत स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या बाबत ठोस उपाय योजना केल्या नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. मनमानी पद्धतीने व्यावसायिक वाहने उभी केली जात असल्याने या मुख्य रस्त्यावर अपघाताच्या घटना नियमित होत आहेत. येथील तक्रारीची दखल घेत काल वाहतूक शाखेने वाहनांना जॅमर लावले. मागील महिन्यात पालिका प्रशासन व वाहतूक शाखेने संयुक्त कारवाई केली होती. मात्र या भागातील पार्किंग समस्या आजही सुटलेली नाही.या भागात खासगी व्यावसाय करणारी वाहने पार्क केली जातात. या बाबत स्थानिक नगरसेवकांनी पालिका सभागृहात विषय मांडला होता. मात्र या बाबत पालिका प्रशासन व वाहतूक शाखा ठोस कारवाई करत नसल्याने येथील प्रश्न सुटत नाही. येथील कारवाई करण्याबाबत राजकीय दबाव आल्याची चर्चा आता नागरिक करत आहेत. नागरिकांच्या व वाहचालकांच्या समस्या कायम स्वरुपी सोडविण्यासाठी योग्य कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

गुन्हे दाखल करायला हवेतआकुर्डी-चिंचवड गाव मार्गावर व्यावसायिक वाहने उभी केल्याने याचा त्रास नागरिकांना होत आहे. अनेक तक्रारी नागरिक करत आहेत. या बाबत योग्य कारवाई व्हावी या साठी पालिका सभागृहात विषय मांडला आहे. पालिका प्रशासनाने वाहतूक शाखेला बरोबर घेऊन मोठ्या दंडात्मक स्वरूपाची कारवाई करणे गरजेचे आहे. तसे अधिकार पालिका प्रशासनाकडे आहेत. मात्र राजकीय वरदहस्त असल्याने या भागात ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे अपघाताचे प्रकार वाढले आहेत. मनमानी पद्धतीने पार्किंग करणाऱ्या या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करायला हवेत.- प्रमोद कुटे, नगरसेवक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड