शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, खयाल रखना; त्याचा शेवटचा फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 10:43 IST

Ahmedabad Air India Plane Crash: ‘‘अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..!’’ असे फोनवर सांगत तो विमानात बसला आणि काही वेळातच त्याचे विमान कोसळले. बावीस वर्षांच्या तरण्याबांड देहाचा कोळसा झाला...

- जमीर सय्यदनेहरूनगर (पिंपरी, जि. पुणे) : ‘‘अम्मी, मैं लंडन जा रहा हूं, अपना खयाल रखना..!’’ असे फोनवर सांगत तो विमानात बसला आणि काही वेळातच त्याचे विमान कोसळले. बावीस वर्षांच्या तरण्याबांड देहाचा कोळसा झाला... पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर येथील इरफान समीर शेखची ही दर्दभरी दास्तान. एअर इंडियात क्रू मेंबर असलेल्या इरफानचा अहमदाबाद येथे विमान दुर्घटनेत मृत्यू झाला अन् अवघे शहर सुन्न झाले.

आईला करायचा फोन इरफान नेहमी विमानात बसण्यापूर्वी आईला फोन करून कळवत असे. गुरुवारच्या दुर्घटनेनंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या पाहताना आईच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.  

पुण्यातील डॉ. डी. वाय. पाटील स्कूल, जयहिंद महाविद्यालयात झाले शिक्षण इरफानने अम्मी-अब्बू-भय्यासोबत आठवडाभरापूर्वी साजरी केलेली बकरी ईद शेवटचीच ठरली. इरफान शेख एअर इंडिया कंपनीत कॅबिन क्रू म्हणून दोन वर्षांपासून कार्यरत होता. संत तुकारामनगर परिसरातील डॉ. डी. वाय. पाटील स्कूलमध्ये तो दहावीपर्यंत, तर पिंपरीतील जयहिंद महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकला. मनमिळाऊ स्वभावाच्या उमद्या तरुणाच्या मृत्यूने शोककळा पसरली.मुंबईमध्ये हवाई वाहतुकीतील तंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून इरफान आधी विस्तारा कंपनीत आणि त्यानंतर एअर इंडियात दाखल झाला होता.  त्याचे वडील समीर नूरमहंमद शेख यांचा पराठ्याचा व्यवसाय आहे. तर आई तसलीम गृहिणी आहेत. मोठा भाऊ अमीर सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात नोकरीस आहे.

इरफान सुटीवर आला की मला भेटायचा यायचा. ईददिवशीच आम्ही भेटलो होतो. गप्पा मारल्या. सोबत जेवणही केले. ती ईद त्याच्यासोबतची शेवटची ठरली. त्याच्या जाण्याने आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.- फिरोज शेख, चुलते, संत तुकारामनगर

आठ दिवसांपूर्वी होता घरीबकरी ईद साजरी करण्यासाठी सुटी घेऊन इरफान आठ दिवसांपूर्वी घरी आला होता. ईद साजरी करून ९ जून रोजी मुंबई येथे कामावर गेला. गुरुवारी (१२ जून) अहमदाबाद येथून लंडनला जाणाऱ्या विमानात क्रू मेंबर म्हणून त्याची ड्यूटी होती. विमानात जाण्यापूर्वी आईला फोन करून त्याने निरोप दिला आणि काही वेळातच काळाने घात केला.एअर इंडियाकडून घरी कळविण्यात आले. आई-वडील, मोठा भाऊ तातडीने अहमदाबादकडे रवाना झाले.शुक्रवारी सकाळी त्याच्या चुलत्यांकडून ही बातमी परिसरात समजली. 

 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडियाahmedabadअहमदाबादpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड