शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे आकुर्डी प्राधिकरण कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 13:29 IST

अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने गुरूवारी (दि. २३) बोंबाबोंब आंदोलनाचा पवित्रा घेतला.

ठळक मुद्देसकाळी १० वाजता दगडोबा चौक, चिंचवडेनगरपासून बोंबाबोंब आंदोलनाची सुरूवात रिंगरोड बाधित नागरिकांसह प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे असणारे नागरिक सहभागीअनधिकृत बांधकामधारकांची घरे नियमित करण्याच्या जाचक अटी रद्द व्हाव्यात, ही मागणी

पिंपरी : चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने व महापालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जाचक अटी व क्लिष्ट कागदपत्रांची पूर्तता करण्याची अट घातलेली आहे. तसेच जिजया कर, शास्ती कर, चालु बाजारभावानुसार भुखंडाचे मूल्य व आरक्षण, रिंगरोड बाधितांकडून हमिपत्र लिहून घेण्याचा घातलेला घाट याच्या विरोधात प्रशासानाचा निषेध म्हणून जाचक अटी रद्द करण्याच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने गुरूवारी (दि. २३) बोंबाबोंब आंदोलनाचा पवित्रा घेतला. अनधिकृत बांधकामधारकांची घरे नियमित करण्याच्या जाचक अटी रद्द व्हाव्यात या मागणी करिता सकाळी १० वाजता दगडोबा चौक, चिंचवडेनगरपासून बोंबाबोंब आंदोलनाची सुरूवात झाली. या मध्ये रिंगरोड बाधित नागरिकांसह प्राधिकरण हद्दीतील अनधिकृत घरे असणारे नागरिक, महिला हातात प्रशासनाच्या जाचक नियमावलीचे निषेध करणारे फलक घेऊन सहभागी झाले होते. प्राधिकरणाने नियमित करण्यासाठी घातलेल्या अटी रद्द कराव्यात, नाममात्र दंड आकारून घरे नियमित करावीत, कालबाह्य झालेला रिंगरोड रद्द करावा अशा घोषणा आंदोलनकर्ते देत होते. हे बोंबाबोंब आंदोलन आकुर्डी येथील नवनगर विकास प्रधिकरणावर धडकल्यानंतर येथे प्रशासनाच्या भूमिकेबद्दल सभा घेऊन विचार मांडण्यात आले. स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक धनाजी येळकर म्हणाले, प्राधिकरण प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीमध्ये अनधिकृत बाधितांचा अर्थिक सक्षमतेचा विचार न करता, कोणालाही न परवडणारा भुखंडाचा चालू बाजारभाव, विकसन शुल्क, एफ. एस. आय. पेक्षा वाढीव बांधकामाच दंड, पार्किंग नसलेल्याचा दंड, शास्तीकर पूर्ण भरल्याशिवाय नियमतीकरण्याचा अर्ज न स्वीकारणे अशा प्रकारे एक हुकमशाही नियमावली तयार करून सनदशीर मार्गाने सुरू असलेल्या आंदोलकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम केले आहे. म्हणून स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने या प्रशासनाचे डोके ठिकाणावर आहे का? हे विचारण्यासाठी बोंबाबोंब आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. आंदोलनाचे नियोजन स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीचे समन्वयक समन्वयक राजेंद्र देवकर, राजश्री  शिरवळकर, प्रतिभा कांबळे, ज्योती वायकर, विद्या  पाटील, संगीता सोनावणे, मनोहर  पवार, विशाल पवार, प्रशांत  सपकाळ, अमोल पाटील, शिवाजी  पाटील, अतुल वर्पे, दत्ता चिंचवडे, देवेंद्र  भदाणे, मनोज पाटील, सुदर्शन भराटे, जितेंद्र पाटील, सुनील पाटील, गणेश  सरकटे,  दत्ता गायकवाड, विजय म्हेत्रे  यांनी केले आहे. या आंदोलनात अनधिकृत बांधकामग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड