शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आदर्श विद्यालयाच्या इमारतीवर हातोडा, तहसीलदारांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 01:57 IST

- तळेगाव येथील शासनाच्या जागेतील शासकीय-निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या ४४ गुंठे जागेपैकी २० गुंठ्यात मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे.

तळेगाव स्टेशन - तळेगाव येथील शासनाच्या जागेतील शासकीय-निमशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या ४४ गुंठे जागेपैकी २० गुंठ्यात मावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे अनधिकृतपणे बांधकाम केले आहे. त्यामुळे शासकीय जागेतील मावळ शिक्षण प्रतिष्ठानची इमारत त्वरित पाडण्याचे आदेश मावळ तहसीलदार रणजित देसाई यांनी तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वैभव आवारे यांना नुकतेच दिले.तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीतील ही जागा शासकीय मालकीची आहे. या अनधिकृतपणे बांधलेल्या इमारतीवर त्वरित कारवाई करून विपराव सहकारी गृहरचना संस्थेला जागा परत करावी,अशी मागणी माहिती अधिकारी कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे. विपराव संस्थेचे पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनतर तहसीलदार देसाई यांनी इमारत पाडण्याचा आदेश दिले आहेत.नगर परिषदेच्या शेजारीच सर्व्हे नंबर ५३४ व ५३६ येथे ४,०६६.४६ चौरस मीटर शासकीय जागा होती. त्यात शासकीय- निमशासकीय सेवेतील अधिकाºयांची विपराव सहकारी गृहरचना संस्था ४४ गुंठे जागेचा नगरविकास विभागाकडे असलेल्या २००२ सालीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. साधारण ५५ कुटुंबीयांसाठी गृहरचना संस्थेला मंजुरी मिळाली. २००५ साली जमिनीचे शासकीय मूल्य शासनाकडे जमा केले आहे.दरम्यान, २००८-०९ कालावधीत मावळ शिक्षण प्रतिष्ठानने विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या जागेत अनधिकृतपणे अतिक्रमण करून आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम केले आहे.मुंबई उच्च न्यायालयाने (दि. १९ जुलै २०१७) रोजी मावळ शिक्षण प्रतिष्ठानने गृहरचना संस्थेच्या जागेवर केलेल्या बांधकामावर कारवाई करून या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या जागेवर बांधलेल्या शाळा महाविद्यालयाच्या इमारतीची माहिती देण्याचे आदेश दिले़ त्यावर कारवाई करावी. त्या बांधकामासाठी परवानगी नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी. नगर परिषदेकडूनत्या शाळेचा नकाशा (ब्लू प्रिंट)मंजूर आहे का असल्यास त्याची माहिती देण्यात यावी. नसल्यास त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. सातबारा कोणाच्या नावे आहे, याची संपूर्ण सखोल माहिती आम्हाला देण्यात यावी, असा आदेश दिला होता.वैभव आवारे : तहसीलदारांना विचारून निर्णयमावळ शिक्षण प्रतिष्ठानच्या आदर्श विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या इमारतीचे तसेच संरक्षक भिंतीचे अतिक्रमण नगरपालिकेच्या जागेत नसून, शासकीय जागेत आहे़ त्यामुळे ती कारवाई आम्हाला करता येते का याबाबत निर्णय घेऊन तहसीलदार यांना कळविणार आहे. आमच्या माहितीनुसार ते काम शासकीय प्रशासनाचे आहे़- वैभव आवारे, मुख्याधिकारी तळेगाव दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारीतळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत शासकीय जागा असून, त्या जागेतील विपराव सहकारी गृहरचना संस्थेच्या जागेत मावळ शिक्षण प्रतिष्ठानने अतिक्रमण केले असून, उच्च न्यायालय व जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित बांधकाम पाडण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार तळेगाव दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारी वैभव आवारे यांना मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे अनधिकृत बांधकाम त्वरित पाडण्याचे लेखी आदेश दिले आहेत.- रणजित देसाई, तहसीलदार 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSchoolशाळा