शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकारपणा करणाऱ्या दोषींवर कारवाई हवीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 04:30 IST

पिंपरी : सल्लागार संस्थेच्या कामचुकारपणामुळे पिंपरी-चिंचवड शहराला राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ६९वा क्रमांक मिळाला. यात दोषी असणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कडक कारवाई ...

पिंपरी : सल्लागार संस्थेच्या कामचुकारपणामुळे पिंपरी-चिंचवड शहराला राहण्यायोग्य शहरांच्या यादीत ६९वा क्रमांक मिळाला.यात दोषी असणाऱ्यांवर महापालिका आयुक्तांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांनी केली.

केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात आलेल्या राहण्यायोग शहराच्या यादीत उद्योगनगरीची पिछाडी झाली. सल्लागारावर महापालिकेची भिस्त असल्याने, केंद्राने मागविलेली माहिती परिपूर्ण नसल्याने गुणवत्ता असतानाही शहर मागे पडले. सल्लागारामुळेच महापालिकेला अपयश आले. निष्क्रिय प्रशासनामुळेच अपयशाचे खापर सत्ताधारी पक्ष आणि शहरवासीयांवर फुटले. केंद्राला पाठविलेला अहवाल लोकमतने मिळविला आणि अहवालातील सत्य जनतेसमोर आणले. अहवालातील गोलमाल उघड केला. सल्लागारांची पाठराखण महापालिका करीत असल्याचे शहरवासीयांच्या निदर्शनास आणून दिले. प्रशासनामुळेच शहराला अपयश आले. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी महापालिकेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांनी केली आहे.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘महापालिकेची भिस्त ही सल्लागारांवरच आहे. सल्लागारांना पोसण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. मोठ्या विकासकामांना सल्लागार नेमणे योग्य आहे. मात्र, छोट्या कामांना नेमणे चुकीचे आहे. राहण्यायोग्य शहरात प्रशासनाच्या चुकीने आपण मागे पडलो. त्यामुळे दोषी कोणीही असो, त्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.’’

मनसे गटनेते सचिन चिखले म्हणाले, ‘‘सल्लागारांवर कोट्यवधींचा खर्च होत आहे. राहण्यायोग्य शहरात आपली पिछाडी झाली. खरेच आपले शहर राहण्यायोग्य नाही का, याचे उत्तर होय हे आहे. असे असताना केंद्राला पाठविलेली माहिती, अहवाल याची तपासणी करणे गरजेचे आहे. प्रशासनाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.’’महापौर : प्रशासनाने आत्मपरीक्षण करावेमहापौर राहुल जाधव म्हणाले, ‘‘आपले शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करीत आहे. पुण्या-मुंबईचे लोक आपल्या शहरात वास्तव्य करण्यास घर घेण्यास प्राधान्य देतात. मात्र, राहण्यायोग्य शहरांच्या यादीत आपण मागे का पडलो, याचे आत्मपरीक्षण प्रशासनाने करायला हवे. चुका शोधायला हव्यात. उपाययोजना करायला हव्यात.’’

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड