शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणीत १६ बांधकामावर पालिकेचा हातोडा; सलग २ दिवस सुरू राहणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 18:03 IST

पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग  प्रभाग यांच्या वतीने रहाटणी येथील सुमारे १७ हजार ००० चौरस फुटाचे १६ बांधकामे भुईसपाट केली.

ठळक मुद्देपाडण्यात आल्या सुमारे १५ हजार चौरस फुटाच्या १५ व्यावसायिक पत्रा शेडकारवाईचे सत्र सुरू झाल्याने व कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नागरिक संकटात

रहाटणी : पालिकेच्या बांधकाम परवानगी अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग  प्रभाग यांच्या वतीने रहाटणी येथील गोडांबे कॉर्नर ते तापकीर मळा चौक या रस्त्यावरील नव्याने सुरु असलेल्या निळ्या पूररेषेतील व्यावसायिक पत्राशेड व एका आरसीसी बांधकामावर कारवाई करून सुमारे १७ हजार ००० चौरस फुटाचे १६ बांधकामे भुईसपाट केली. त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या परिसरात सलग दोन दिवस ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.मागील काही दिवसांपासून पालिकेची अनधिकृत बांधकामावरील कारवाई पुन्हा एकदा जोमात सुरु झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एक गुंठा अर्धा गुंठ्यात ज्या नागरिकांचे बांधकाम आहे त्यांनाही पालिका प्रशासनाने नोटिसा दिल्या आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहे. कारवाईचे सत्र सुरू झाल्याने व कारवाईची टांगती तलवार डोक्यावर असल्याने नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. गोडाबे कॉर्नर ते तापकीर मळा चौक या रस्त्यावरील सुमारे १५ हजार चौरस फुटाच्या १५ व्यावसायिक पत्रा शेड पाडण्यात आल्या तर २ हजार चौरस फुटाचे एक आरसीसी बांधकाम पाडण्यात आले.या परिसरातील संबधित मिळकतधारकांना अतिक्रमण स्वत: हुन काढून घेण्यासाठी नोटीस बजावली होती. अनेकांनी मागील काही दिवसांपासून अतिक्रमणे काढून घेत होती. नोटिशीचा कालावधी संपताच पालिका प्रशासनाच्या संबधित विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात केली .यातील बरेच अनाधिकृत पत्राशेड ही निळी पुररेषेत आहेत. कारवाई काळात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून अनधिकृत पत्राशेडचे बांधकाम पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पोलिसा बरोबरच वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. अचानक सुरु झालेल्या कारवाईमुळे नागरिक भयभीत झाले. ही कारवाई कार्यकारी मनोज शेठीया यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम परवानगीव् अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग ग यांच्या पथकाने केली. 

टॅग्स :rahatniरहाटणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड