शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत बेशिस्त वाहतूकीला लगाम, अतिक्रमणांवरही कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:04 IST

हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत, त्यात उलट दिशेने येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे.

ठळक मुद्देअडथळा ठरणाऱ्या हातगाड्या, टपऱ्या जप्तकारावास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा

पिंपरी : हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना हाती घेतल्या आहेत, त्यात उलट दिशेने येणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. त्याचबरोबर आता रहदारीस अडथळा ठरणाऱ्या  हातगाड्या, टपऱ्या जप्तीची कारवाई केली जात आहे. सोमवारी झालेल्या कारवाईत डांगे चौकातील १५ हातगाड्या आणि ४ टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवारी या परिसरात रस्ते काही अंंशी मोकळे झाल्याचे दिसून आले. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी हिंजवडी, वाकड परिसरातील वाहतुक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी अधिक लक्ष वेधले आहे. प्रायोगिक तत्वावर वाहतुक मार्गात काही बदल केले आहेत. केवळ हिंजवडी, वाकड हाच परिसर नाही तर उलट दिशेने वाहन चालवुन अपघातास निमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण करणाऱ्या वाहन चालकांविरूद्धच्या कारवाईची तीव्र मोहिम संपूर्ण शहरात राबवली जात आहे. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ठिकठिकाणी पोलीस पथके उलट दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. मोठ्या प्रमाणावर ही मोहिम सुरू आहे. महापालिका अतिक्रमण विभाग आणि वाकड पोलीस यांच्या वतीने डांगे चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडी आणि दुकानांवर कारवाई करण्यात आली. या पुढील काळात देखील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या हातगाडया, दुकाने यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बेशिस्त पार्किंग तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. भारतीय दंड संहिता २७९ नुसार कारवाईवाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन उलट दिशेने निष्काळजीपणे वाहन चालवुन धोकादायक परिस्थिती निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर भारतीय दंड संहिता कलम २७९ प्रमाणे गुन्हा दाखल करा. असे आदेश आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिल्यानंतर शहरात सर्वत्र कारवाई सुरू आहे. रोज २० ते २५ वाहन चालकांवर अशी कारवाई होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाला भारतीय दंड संहितेच्या कलम २७९ नुसार विशिष्ट कालावधीसाठी कारावासाची शिक्षा सुनावली जाते. त्यात सहा महिन्यापर्यंत वाढ करण्याची तरतुद आहे. कारावास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. वाहन चालकांनी उलट दिशेने वाहने चालवु नयेत. असे आवाहन पोलिसांनी केले. आहे.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीTrafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीस