शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगर भूमापण अधिका-यांवर कारवाई ? थेरगावातील भूसंपादनच्या चौकशी अहवालात सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 04:23 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने थेरगावातील चार हेक्टर जागा संपादन केली असताना नगर भूमापन अधिका-यांनी प्रॉपर्टी कार्ड तयार केले. त्यासाठी पीसीएनडीटीएला नोटीसही दिली नाही.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने थेरगावातील चार हेक्टर जागा संपादन केली असताना नगर भूमापन अधिका-यांनी प्रॉपर्टी कार्ड तयार केले. त्यासाठी पीसीएनडीटीएला नोटीसही दिली नाही. ही बाब संशयास्पद असून, नगर भूमापन अधिका-यासह संबंधित कर्मचा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पीसीएनडीटीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके यांनी चौकशी अहवालात केल्या आहेत.पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी थेरगाव येथील ७ हेक्टर ३८ गुंठे जागा संपादनाकरिता अधिसूचित केली होती. विभागीय आयुक्तांनी १३ डिसेंबर १९८४ ला ३ हेक्टर ३८ गुंठे जागा बागायत जमीन म्हणून वगळली. ही बागायती जमीन वगळल्यामुळे चार हेक्टर जागेचा अंतिम निवाडा २३ सप्टेंबर १९८६ ला जाहीर झाला. ही चार हेक्टर जागा संपादनात आहे. ही जमीन संपादीत केल्यावरही मूळ मालकाने प्रत्यक्ष ताबा दिला नाही. त्यामुळे विशेष भूमिसंपादन अधिकाºयांनी त्यांच्याकडून ३१ मे १९८९ रोजी ताबा घेतला. मात्र, मूळ मालकाने नुकसान भरपाईची रक्कम स्वीकारली नाही.या प्रकरणात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. प्राधिकरणाने संपादीत जमिनीचा ताबा देण्याबाबत उपजिल्हाधिकारी यांना २४ फेब्रुवारी २०१२ ला कळविले.पिंपरी-चिंचवड नगर भूमापन अधिकाºयांनी कोणतीही नोटीस न देता प्रापर्टी कार्ड तयार करून दिले. त्यामुळे पीसीएनडीटीएने १० मे २०१२ रोजी महापालिका नगर रचना उपसंचालक आणि शहर अभियंता यांना या ठिकाणी बांधकाम परवानगी देऊ नये आणि दिली असल्यास स्थगिती द्यावी, असे कळविले.आदेशाचे उल्लंघन करुन सातबा-याचे वाटपजागेवर संपादनाचा शेरा असतानाही तत्कालीन मुळशी तहसीलदारांनी जाणून-बुजून कलम ८५ अन्वये स्वतंत्र सात-बारा वाटप केले. महापालिकेने बांधकाम परवानगी दिली. या जागेवर इमारतीही उभ्या राहिल्या. महापालिकेने या बांधकामांना काम थांबवण्याबाबत अद्यापही नोटीसही बजावली नाही. या जमिनीवर झालेल्या बांधकामातील सदनिका विक्री होऊ नये म्हणून दस्त नोंदणीसाठी आल्यास नोंदणी करू नये, असे पत्र नोंदणी महानिरीक्षक यांना पाठविण्यात येणार आहे. तसेच सहकारी संस्था उपनिबंधकांनीही गृहरचना संस्थेची नोंदणी करू नये. याशिवाय महापालिकेनेही या इमारतीला पाणी जोड देऊ नये, कर आकारणी करू नये, अशी सूचना खडके यांनी केली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड