शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंगविरोधात कारवाई, लोणावळा नगर परिषदेची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:01 IST

कारवाई : लोणावळा नगर परिषदेतर्फे धडक मोहिमेंतर्गत शहर आणि परिसरातील बेकायदा होर्डिंगवर कारवाई करताना पथक.

लोणावळा : लोणावळा शहराच्या सौंदर्याला विद्रूप करणाऱ्या र्होडिंगच्या विरोधात लोणावळा नगर परिषदेने धडक कारवाई मोहीम सुरू केली आहे. महामार्गालगतचे २५ ते ३० मोठे र्होडिंग काढण्यात आले. निसर्गसंपदेने बहरलेल्या लोणावळा शहरातून जाणाºया मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जाहिरातीचे र्होडिंग लावले जात होते. नगर परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांचेच र्होडिंग व्यावसायिकांसोबत असलेले आर्थिक लागेबांधे व त्यामधून चुकीच्या पद्धतीने दिलेल्या परवानग्या यामुळे दिवसागणिक शहराच्या विद्रूपीकरणात वाढ होऊ लागली होती. या र्होडिंगविरोधात वारंवार काही लोकप्रतिनिधी व संघटना यांनी आवाज उठविला होता. या पार्श्वभूमीवर लोणावळा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेने या र्होडिंगविरोधात कारवाई करण्याचा ठराव व धोरण राबवीत ते र्होडिंग काढण्याकरिता निविदा पद्धतीने काम दिले आहे.

शहरात सध्या या जाहिरात र्होडिंगच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरू झाली आहे. अनेक र्होडिंग बेकायदा असल्याचे समोर आले आहे. काहीपरवान्यांची मुदत संपलेली असतानाही र्होडिंग व्यवसाय सुरू आहे. आता मात्र या र्होडिंगविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, लोणावळा शहर र्होडिंगमुक्त करण्यात येणार आहे. काही र्होडिंग व्यावसायिकांनी या कारवाईविरोधात तालुका न्यायालयातून स्थगिती मिळवली आहे. मात्र शहरे र्होडिंगमुक्त करा, असा उच्च न्यायालयाचा आदेश असल्याने या आदेशाचा आधार घेत सदर स्थगिती उठविण्याकरिता नगर परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसांत लोणावळा शहर र्होडिंगमुक्त झाल्याचे पाहायला मिळणार आहे.लोणावळा र्होडिंगमुक्त करणारपर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहराला मोठमोठ्या र्होडिंगमुळे ग्रहण लागले होते. खंडाळा भागातील हिरवेगार डोंगर व व्हॅली या सौंदर्याला पर्यटकांना मुकावे लागत होते. शहरही विद्रूप होऊ लागले होते. याकरिता शहरात र्होडिंगविरोधात कारवाई सुरू करण्यात आली. शहरातील सर्व मोठी र्होडिंग काढण्यात येणार असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व मुख्याधिकारी सचिन पवार यांनी सांगितले.या कारवाईचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. कारवाईत कोणताही पक्षपातीपणा होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. नगर परिषदेप्रमाणेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने अपघातांना कारणीभूत ठरत असलेले महामार्गालगतचे बेकायदा र्होडिंग काढून टाकावेत, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळा