शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ऑईल गळती झाल्याने दुचाकी घसरून अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 02:31 IST

डांगे चौक-चिंचवड मार्ग : तरुणांची तत्परता; अग्निशामक दलाला केले पाचारण

थेरगाव : येथील डांगे चौककडून चिंचवडला जाणाऱ्या मार्गावर बारणे चाळ ते रोझवूड हॉटेल या १ किमी अंतरादरम्यान रस्त्यावर ऑईल गळती झाली होती. त्यामुळे पूर्ण ऑइल रस्त्यावर पसरले होते. या ऑइल गळतीमुळे येणारी वाहने घसरून अपघात होऊ लागले होते. थेरगावमधील तरुणांच्या तत्परतेमुळे अनेक अपघात टळले.

ऑईल सांडल्यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून या ठिकाणी अपघात झाले. अनेकांना शारीरिक दुखापत झाली. या वेळी स्थानिक नागरिक सुहास शिगवण व रुपेश पाटसकर यांनी ही घटना पाहिली व थेरगाव सोशल फाउंडेशनच्या सदस्यांना कळविली. ही गोष्ट सदस्यांना समजली असता त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. त्यामुळे कसलाही विलंब न करता अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आॅइल सांडलेल्या ठिकाणी पाणी मारून रस्ता साफ केला.

घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी येईपर्यंत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी थेरगाव फाउंडेशनचे सदस्य राहुल सरवदे, अंकुश कुदळे, प्रशांत चव्हाण, अशोक धुमाळ, सचिन झरेकर, शेखर गांगर्डे व वाहतूक पोलीस यांनी सहकार्य केले.डांगे चौक हा शहरातील मोठा मार्ग असल्यामुळे या ठिकाणी दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ चालू असते. अग्निशामक दलाने वेळेत येऊन सांडलेले आॅइल साफ केल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. तत्काळ सहकार्य केल्याबद्दल थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने वाहतूक पोलीस व अग्निशामक दलाच्या कर्मचाºयांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

आॅईल सांडले असल्याने दुचाकीचालकांना कसरत करावी लागत होती. ही बाब लक्षात घेत तरुणांनी अग्निशामक दलाला याबाबत माहिती दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचा बंब दाखल झाला. तसेच रस्त्यावर पाणी मारून रस्ता स्वच्छ करण्यात आला. त्याबद्दल वाहनचालकांनी संबंधित तरुणांचे आभार मानले.